Take a fresh look at your lifestyle.

ऑनलाइन 7/12, फेरफारवर आता जिल्हाधिकाऱ्यांची नजर! भूमी अभिलेखाकडून लॅन्ड डॅशबोर्ड सुविधा सुरू, नोंदी घेण्याची प्रक्रिया गतिमान होणार..

सातबारा उतारा, खाते उतारा (८ अ) आणि फेरफार नोंद (गाव नमुना ६) या सुविधा नागरीकांना आधीपासूनच महाभूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापुढे एक पाऊल टाकत सातबारा, फेरफार उताऱ्यावरील नोंद घेण्याची प्रक्रिया गतीने पारदर्शकपणे आणि वेळेत पार पडावी यासाठी त्यावर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना देखरेख ठेवता यावी, यासाठी जमीन माहितीपिठ (लॅन्ड डॅशबोर्ड) सुविधा भूमी अभिलेख विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या डॅशबोर्डमुळे नोंदी घेण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे. महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात येणाऱ्या ६६ ऑनलाइन सुविधा एकाच डॅशबोड उपलब्ध करून देण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.

त्यामुळे नागरिकांना आता एकाच संकेतस्थळाला भेट देऊन या तिन्ही विभागाच्या सुविधांचा लाभ घेणे सोईचे जावे. या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर प्रत्यक्षात त्यांची नोंद फेरफार आणि सातबारा उताऱ्यावर घेण्याच्या प्रक्रियेत अनेकदा विलंब होतो. या विलंबामागची कारणे काय आहेत, त्यांचा वेळेत निपटारा का होत नाही, यावर देखरेख ठेवणारी कोणतीही यंत्रणा नाही.

ती आता या डॅशबोर्डच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. त्या मुळे प्रत्येक जिल्हानिहाय जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनादेखील या सुविधा डॅशबोर्डच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत..

या डॅशबोर्डच्या माध्यमातून किती सातबारा आणि फेरफार उताऱ्या अथवा खाते उताऱ्याच्या नोंदी प्रलंबित आहेत. त्या मागील कारणे काय आहेत, यावर देखरेख ठेवणे शक्य हाणार आहे. त्यानुसार लॅन्ड डॅशबोर्डसह सुविधा भूमी अभिलेख विभागाकडून विकसित करण्यात आली आहे.

त्यामुळे एकाच संकेतस्थळावर तिन्ही विभागाकडून कोणकोणत्या सुविधा ऑनलाइन दिल्या जात आहेत. त्यांची माहिती एकाच पेजवर उपलब्ध झाली आहे. त्या मुळे नागरिकांना ज्या विभागाकडे काम आहे त्या विभागाशी संलग्न सेवांवर जाऊन ऑनलाईन सुविधांचा लाभ घेता येणे आता शक्य झाले आहे.

प्रत्येक जिल्ह्यांच्या आणि पाचही विभागांच्या आयुक्तांच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातून जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना त्यावर देखरेख ठेवणे आता शक्य होणार आहे.

लॅन्ड डॅशबोर्ड सुविधा :- mahabhumi.gov.in 

सुविधेची ठळक वैशिष्ट्ये :- 

भूमी अभिलेख विभाग एकूण नऊ सुविधा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या एकूण ११ सुविधा

महसूल विभागाच्या एकूण १७ सुविधा

आपले सरकार पोर्टलवरील एकूण ३३ सुविधा

या सर्व सुविधा आता डॅशबोर्डवर एकाच पेजवर उपलब्ध या सुविधांवर आता थेट विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्याचे नियंत्रण

परिणामी गतिमान, पारदर्शक आणि वेळेत नोंदी होण्यास मदत होणार.