Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra ZP Bharti 2023 : अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना, असे झाल्यास ZP जबाबदार राहणार नाही..

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये ‘क’ वर्गातील पदे भरण्यात येत आहेत. 34 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 19 हजार 460 पदे भरली जात आहेत. इच्छुकांना 25 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

सर्व ठिकाणी एकाच कालावधीत पदनिहाय संगणीकृत परीक्षा होणार, म्हणून एकाच पदासाठी जास्त जिल्हा परिषदेत अर्ज करू नये.अशाने शुल्काचा नाहक खर्च होणार. प्रवेशपत्र हे संगणीकृत यंत्रणेमार्फत तयार होणार असल्याने उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा अधिक

ठिकाणी अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेशपत्रनुसार उमेदवारास एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षा क्रमांक आल्यावर त्या ठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

ZP च्या 8,939 पदांसाठी अर्ज झाले सुरु, पहा जिल्हानिहाय कुठे किती जागा ?

ऑनलाईन अर्ज प्रोसेस..

म्हणून एकाच जिल्हा परिषदेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे, तसेच दोन अर्ज भरले असल्यास दुसरा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. परीक्षेच्या तारखेबाबत उमेदवारांनी सातत्याने जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ पाहण्याची सूचना करण्यात आली आहे.