Take a fresh look at your lifestyle.

MAHATransco: ITI च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर ! महापारेषणमध्ये 2541 जागांवर मेगाभरती; पगार 88 हजारांपर्यंत, पहा अर्ज लिंक.. 

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडने बंपर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ती 10 डिसेंबर 2023 पर्यंत चालणार आहे..

या भरतीमध्ये सामील होण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार Mahatransco च्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन फॉर्म भरू शकतात. अर्ज भरण्यापूर्वी, उमेदवारांनी विविध पदांसाठी विहित केलेले पात्रता निकष तपासणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच फॉर्म भरावा त्यासाठी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा..

भरती डिटेल्स..

या भरतीद्वारे विविध पदांअंतर्गत एकूण 2541 पदे भरण्यात येणार आहेत. पोस्टनिहाय भरती डिटेल्स खालीलप्रमाणे आहेत :-

सीनियर टेक्निशियन : 121 जागा
टेक्निशियन – 1 : 200 पदे
टेक्निशियन – 2: 314 पदे
इलेक्ट्रिकल असिस्टंट : 1903 पदे

पात्रता आणि निकष :-

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात 10वी / ITEI / डिप्लोमा / BE / B.Tech / पोस्ट ग्रॅज्युएट पदवी इ. पदानुसार मान्यताप्राप्त बोर्ड / संस्थेमधून प्राप्त केलेली असावी. यासोबतच अर्ज करताना उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. वयोमर्यादेत नियमानुसार सवलत दिली जाईल. पात्रतेबद्दल अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासणे आवश्यक आहे..

महापारेशन भर्ती 2023 : सिलेक्शन प्रोसेस..

या भरतीमध्ये निवड होण्यासाठी उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षेत सहभागी व्हावे लागेल. लेखी परीक्षेत विहित कटऑफ गुण प्राप्त करणार्‍या उमेदवारांना भरती, मुलाखत, कागदपत्र पडताळणी प्रक्रिया आणि वैद्यकीय चाचणीच्या पुढील टप्प्यासाठी बोलावले जाईल. सर्व टप्प्यांत यशस्वी झालेल्या उमेदवारांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान दिले जाईल..

परीक्षा फी : –

पद क्र.1 ते 3 : खुला प्रवर्ग : ₹600/-, [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹300/-]
पद क्र.4 : खुला प्रवर्ग: ₹500/-, [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹250/-]

इतका पगार मिळेल : –

सीनियर टेक्निशियन – रु. 30810-1060-36110 – 1160 – 47710 – 1265 – 88190/- या वेतनश्रेणीत वेतन मिळेल..
टेक्निशियन 1 – रु. 29935 – 955 – 34710 – 1060 – 45310 – 1160 – 82430/- या वेतनश्रेणीत वेतन मिळेल..
टेक्निशियन 2 – रु. 29035 – 710 – 32585 – 955 – 42135 – 1060 – 72875/- या वेतनश्रेणीत वेतन मिळेल.
इलेक्ट्रिकल असिस्टंट :-
प्रथम वर्ष – 15000/-
द्वितीय वर्ष – 16000/-
तृतीय वर्ष – 17000/-

महत्वाच्या लिंक..

 पद क्र.1 ते 3 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा 

पद क्र.4 भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज लिंक :- Mahatransco Recruitment 2023