Take a fresh look at your lifestyle.

MPSC Rajyaseva Prelims 2022 : MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे हे 25 प्रश्न ; पहा, तुम्हाला किती उत्तरं येतात ?

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC द्वारे घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवारी संपूर्ण महाराष्ट्रभर सुरळीत पार पडली. या परीक्षेत राज्यसेवा पूर्व परीक्षा सेट – B मधील प्रश्नसंचातील 25 प्रश्न आणि त्यांचे उत्तरे जाणून घेणार आहोत…

प्रश्न 1 : मुंबई मध्ये खालीलपैकी कोणत्या दोन ठिकाणी ब्रिटीशांच्या काळात मीठाच्या पेठा होत्या ?
पर्याय :-
(1) छ. शिवाजी महाराज टर्मिनस व वडाळा
( 2) भेंडी बाजार व वडाळा
(3) चर्नी रोड व वडाळा
(4) पनवेल व वडाळा

उत्तर :- चर्नी रोड व वडाळा

प्रश्न 2 : भारतीय दंड साहित्येच्या कलम 377 मध्ये पुढील कोणत्या विषयाचा उल्लेख आहे ?
पर्याय :-
(1) मंदिर प्रवेश
(2) समलैगिकता
(3) व्यभिचार
(4) सरोगसी

उत्तर :- (2) समलैगिकता

प्रश्न 3 : राष्ट्रीय पातळीवरील ऑल इंडिया स्टेट्स पीपल्स कॉग्रेस ची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची गाऱ्हाणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना कार्यरत होती ?
पर्याय :-
(1) लोकसभा
(2) राज्यसभा
(3) विधानसभा
(4) परोपकारिणी सभा

उत्तर :- परोपकारिणी सभा

प्रश्न 4 : 1957 च्या स्त्रीशिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या ?
पर्याय :-
(1) अनुताई वाघ
(2) शांताबाई दाणी
(3) दुर्गाबाई देशमुख
(4) दुर्गाबाई भागवत

उत्तर :- दुर्गाबाई देशमुख

प्रश्न 5 : सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली होती ?
पर्याय :-
(1) आत्माराम पांडुरंग तरखडकर
(2) दादोबा पांडुरंग तरखडकर
(3) रा. गो. भांडारकर
( 4 ) कृ. त्र्यं. तेलंग

उत्तर :- (2) दादोबा पांडुरंग तरखडकर

प्रश्न 6 : उत्तर भारताविषयी तपशीलवार माहिती असलेला तहकिक – इ – हिंद हा ग्रंथ कोणी लिहीला ?
पर्याय :-
(1) महमूद गझनी
(2) अल्बिरूनी
(3) इल बहुता
(4) अब्दुल रज्जाक

उत्तर :- अल्बिरूनी

प्रश्न 7 : राजस्थान मध्ये मध्याश्म युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण कोणते ?
पर्याय :-
(1) बागोर
(2) आदमगड
(3) प्रतापगड
(4) चोपनी – मंडो

उत्तर :- बागोर

प्रश्न 8 : विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कामाची नोंद घेऊन बडोदा सरकारने 1932-33 साली कोणता पुरस्कार देऊन गौरव केला ?
पर्याय :-
(1) सामाजिक पुरस्कार
(2) दलित मित्र
(3) दलित साथी
(4) राव साहेब

उत्तर :- दलित मित्र

प्रश्न 9 : छत्रपति शाहू महाराजांनी शाळेत न पाठविलेल्या मुलांच्या पालकांना प्रत्येक महिन्याला किती दंड आकारण्याचा आदेश काढला होता ?
पर्याय :-
(1) दोन पैसे
(3) पाच पैसे
(2) तीन पैसे
(4) दहा पैसे

उत्तर :- दोन पैसे

प्रश्न 10 : भारता चंद्रशेखर आझाद आणि सरदारजी भगतसिंग या सारख्या क्रांतिकारकाने हिंदुस्थान सोशालिस्ट पब्लिकेशन असोसिएशन नावाची संघटना कुठे स्थापन केली ?
पर्याय :-
(1) मुंबई
(2) नागपूर
(3) कोलकत्ता
(4) दिल्ली

उत्तर :- दिल्ली

प्रश्न 11 : 1757 च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले ?
पर्याय :-
(1) मद्रास
(2) बंगाल
( 3 ) बिहार
(4) ओरिसा

उत्तर :- (2) बंगाल

प्रश्न 12 : ई.स. 1206 ते 1290 या काळात राज्य केलेल्या गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली ?
पर्याय :-
(1) महमूद गझनी
(2) मुहम्मद घोरी
(3) कुतुबुद्दीन ऐबक
(4) इल्तुतमिश

उत्तर :- (c) कुतुबुद्दीन ऐबक

प्रश्न 13 : महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी संशोधन करण्यात आले ?
पर्याय :-
(1) पाटणे (जळगाव)
(2) हातखंबा (रत्नागिरी)
(3) इनामगाव (पुणे)
(4) वरीलपैकी सर्व

उत्तर :- (3) इनामगाव (पुणे)

प्रश्न 14 : …..हे मानवी भूगोलाचे जनक आहेत .
पर्याय :-
(1) हेरोडॉटस
(2) हेकाटायस
(3) विडाल-डी-ला- ब्लाश
(4) ब्रुन्स

उत्तर :- (3) विडाल-डी -ला-ब्लाश

प्रश्न 15 : भारतात खालीलपैकी कोणता हॉट – स्पॉट प्रदेश जैवविविधतेला आपत्ती चिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे ?
पर्याय :-
(1) उत्तरपश्चिम भारत
(2) दख्खनचे पठार
(3) उत्तरपूर्व भारत
(4) पश्चिम भारत

उत्तर :- (3) उत्तरपूर्व भारत

प्रश्न 16 : अल्फा, बिटा व गामा विविधता (Alpha, Beta and Gamma) म्हणजे काय ?
पर्याय :-
(a) सजीवांची श्रीमंती
(b) सिम्पसन विविधता सुची
(c) जैवविविधता मोजण्याचे भौगोलीक प्रमाण
(d) व्हीटाकेर ( Whittaker ) ( 1972 ) यांनी सुचविलेले शब्दार्थ

उत्तर :- फक्त (b) आणि (d)

प्रश्न 17 : रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो ?
पर्याय :-
(a) तापमान व माती
(b) जल व माती
(c) वनस्पती व जल
(d) मानवी क्रिया व जैवपटक

उत्तर :- (1) फक्त (a) आणि (b)

प्रश्न 18 : जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक ( PQLI ) मोजताना कोणता घटक विचारात घेतला जात नाही ?
पर्याय :-
(1) अपेक्षित आयुर्मान
(2) दरडोई उत्पन्न
(3) बाल मृत्यू
(4) साक्षरता

उत्तर :- (2) दरडोई उत्पन्न

प्रश्न 19 : महाराष्ट्र शासनाने….वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प पद्धत स्वीकारली.
पर्याय :-
(1) 2011
(2) 2015
(3) 2013
(4) 2019

उत्तर :- (3) 2013

प्रश्न 20 : 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी होते ?
पर्याय :-
(1) कर्नाटक
(2) महाराष्ट्र
(3) केरळ
(4) मध्य प्रदेश

उत्तर :- महाराष्ट्र

प्रश्न 21 : महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑनलाइन प्लटफॉर्मचे नाव सांगा ?
पर्याय :-
(1) एक थांबा केंद्र योजना
(2) स्वाधार योजना
(3) महिला ई – हाट
(4) डिजिटल भारत

उत्तर :- महिला ई – हाट

प्रश्न 22 :-1 मे 1960 रोजी ‘ मुंबईसह नवमहाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते ?
पर्याय :
( a ) 26 जिल्हे
(b) 28 जिल्हे
(c) 239 तालुके
(d) 229 तालुके

उत्तर : a आणि c बरोबर

प्रश्न 23 : इंडिपेंडेन्स फॉर इंडिया लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
पर्याय :-
(1) जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस
(2) वि. दा. सावरकर
(3) बा. शि. मुंजे आणि मु. रा. जयकर
(4) बा. शि. मुंजे आणि शामाप्रसाद मुखर्जी

उत्तर : (1) जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस

प्रश्न 24 : अण्णाभाऊ साठे यांनी साम्यवादी विचाराचा प्रसार करण्यासाठी खालील कलाप्रकाराचा प्रभावी वापर केला .
पर्याय :-
(1) नाटक
(2) कथाकथन
(3) बतावणी
(4) कलापथक

उत्तर : (4) कलापथक

प्रश्न 25 : खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था ह्या 2007 च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अख्यतारीत येतात ?
पर्याय :-
(1) औपचारिक आणि अनौपचारिक गट
(2) समाजगटाधारित संस्था
(3) धर्मादाय संस्था
(4) समर्थक संस्था

उत्तर : औपचारिक आणि अनौपचारिक गट