Take a fresh look at your lifestyle.

भारतातली सर्वात लांब बुलेट महाराष्ट्रात ! मुंबई ते हैदराबाद गाठता येणार फक्त 3.30 तासांत, अंतिम DPR रेल्वेकडे सादर, पहा Route Map..

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई – पुणे – हैदराबाद हायस्पीड रेल्वे मार्गिकेचा अंतिम आराखडा (DPR) भारतीय हायस्पीड रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडकडून (NHSRCL) अखेर रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून तो रेल्वे बोर्डाला सादर केला जाणार असून, त्यांची मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. NHSRCL ने देशभरात आठ ठिकाणी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामध्ये मुंबई – नागपूर आणि मुंबई – पुणे – हैदराबाद असे दोन प्रकल्प आहेत. त्यापैकी हा एक प्रकल्प आहे. ही ट्रेन तासी 250 ते 320 या वेगाने धावणार आहे.

मुंबई ते हैदराबाद सुमारे 711 किलोमीटरचे अंतर आहे. हे अंतर ही ट्रेन साडेतीन तासांत कापणार आहे. या ट्रेनच्या मार्गावर पुणे, सोलापूर, पंढरपूर असे मोजके थांबे असणार आहेत. या रेल्वेसाठी स्वतंत्र मार्ग टाकण्यात येणार आहे, या रेल्वेचा मार्ग PMRDA च्या हद्दीतील लोणावळा, देहू , सासवड या हद्दीतून जात. मात्र,PMRDA च्या विकास आराखडा हा प्रस्तावित केला नव्हता.

NHSRCL ने पीएमआरडीएला पत्र दिले होते. त्याची दखल घेऊन PMRDA ने प्रस्तावित विकास आरखड्यात हा मार्ग दर्शवला आहे. परिणामी, प्रकल्पाच्या मार्गातील मोठी अडचण दूर झाली; परंतु हाच मार्ग पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 11 गावांमधील फुरसुंगी आणि लोहगावच्या हद्दीतूनदेखील जातो. फुरसुंगीत महापालिकेडून दोन नगररचना योजना (टीपी स्किम) प्रस्तावित केल्या असून, त्यापैकी एका नगररचना योजनेचे प्रारूप महापालिकेने जाहीर केले आहे.

फुरसुंगीमधील दुसऱ्या नगररचना योजनेचे काम अद्याप सुरू आहे. ही दोन गावेवगळता उर्वरित गावांचा विकास आराखड्याचे काम महापालिकेकडून अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, नगररचना योजना आणि प्रस्तावित विकास आराखड्यात महापालिकेकडून हा रेल्वे मार्ग दर्शवण्यात आलेला नाही.

मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेन : कोणत्या स्टेशन्सवर थांबणार ?

इथे करा क्लिक

महापालिकेने त्याला मान्यता दर्शवल्यानंतर सल्लागार कंपनीकडून या रेल्वे मार्गिकेच्या आराखड्याचे काम पूर्ण करून तो NHSRCL ला सादर केला, त्याचे छाणणीचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतरNHSRCL कडून तो आराखडा रेलवे मंत्रालयाकडे सादर केला आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

असा आहे प्रकल्प.. 

प्रकल्पाचा अंदाजे 14 हजार कोटी रुपये खर्च

220 ते 350 प्रतिकिलोमीटर या वेगाने धावणार

प्रवासी क्षमता 750 असणार आहे.

Mumbai Hyderabad Bullet Train रूट मॅप पाहण्यासाठी :- 

इथे क्लिक करा

भूकप झाल्यास आपोआप बेकिंग सिस्टिम

तातडीने भूकंप शोध आणि अलार्म सिस्टम (UPADAS)

मुंबई – हैदराबाद मार्गाची लांबी 711 किमी.

काही मार्ग इलेव्हेटेड तर काही भार्ग भूयारी असणार..