Take a fresh look at your lifestyle.

मुंबईतील पहिली अंडरग्राउंड मेट्रो कुलाबा ते आरे दरम्यान 3 टप्प्यात उघडणार ! आरे ते BKC टप्पा ‘या’ दिवशी होणार खुला..

कुलाबा ते आरे दरम्यान मुंबईतील पहिली अंडरग्राउंड मेट्रो सेवा तीन टप्प्यात प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. बांधकाम पूर्ण होण्यास होत असलेल्या विलंबामुळे मेट्रो – 3 कॉरिडॉरवर दोन टप्प्यांऐवजी तीन टप्प्यात मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MSRC) ने पहिल्या टप्प्यात आरे ते BKC दरम्यान मेट्रो सुरू करण्याची योजना आखली होती आणि उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मेट्रो सेवा सुरू होणार होती. प्रकल्पाला होणारा विलंब पाहता आता पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी, दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते वरळी आणि तिसऱ्या टप्प्यात वरळी ते कुलाबा अशी मेट्रो सेवा सुरू होणार आहे..

सोलर पॅनल सिस्टम

विषयी update मिळवण्या साठी आमचा व्हाट्सअप गृप जॉईन करा

येथे क्लिक करा 

पहिली अंडरग्राउंड मेट्रो सेवा..

मुंबईतील पहिल्या अंडरग्राउंड मेट्रोच्या प्रवासासाठी प्रवाशांची प्रतीक्षा आता लांबत चालली आहे. यापूर्वी, एप्रिलमध्येच आरे आणि बीकेसी दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्याची चर्चा होती, परंतु ट्रायल रनची अनिवार्य प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब झाल्यामुळे पहिल्या टप्प्यासाठी एप्रिलची अंतिम मुदत चुकण्याची शक्यता आहे.

MSRC च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरे ते बीकेसी दरम्यानची मेट्रो मे महिन्यात धावू शकते. तसेच ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या टप्प्यांतर्गत बीकेसी ते वरळी या मार्गावर मेट्रो धावणार आहे. तिसऱ्या टप्प्यांतर्गत उर्वरित मार्गावर 2024 अखेरपर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. ट्रायल रनची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत..

सोलर पॅनल सिस्टम

विषयी update मिळवण्या साठी आमचा व्हाट्सअप गृप जॉईन करा

येथे क्लिक करा 

मेट्रो – 3 चे काम 2016 पासून झाले सुरू..

2016 पासून आरे आणि कुलाबा दरम्यान मेट्रो – 3 कॉरिडॉर बांधला जात आहे. अंडरग्राउंड मेट्रोसाठी आरेतील कारशेड तयार करण्याचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. MSRC ने 9 ट्रेनसह मेट्रो सेवा सुरू करण्याची योजना तयार केली आहे. 8 डब्यांच्या 9 ट्रेन आधीच आरेला पोहोचल्या आहेत. आगारातच सर्व गाड्या असेंबल करण्याचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे..

गेल्या वर्षभरापासून आरे आणि बीकेसी दरम्यान ट्रायल रन सुरू आहे. MSRC ने मेट्रो-3 कॉरिडॉरचे 85 टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण केले आहे. सध्या स्टेशन परिसरात डिव्हाईस बसवण्याचे आणि अंतिम फिनिशिंगचे काम सुरू आहे..