Take a fresh look at your lifestyle.

Pune Metro : मेट्रो लाईन -3 च्या कामाला गती, माण – हिंजवडी ते शिवाजीनगरपर्यंत हे आहेत 23 स्टेशन्स ; पहा Route Map..

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माण – हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो मार्गिका – 3 मुळे हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्या सुटण्यासोबत चार लाख प्रवाशांना लाभ होणार असून, या मेट्रो मार्गिकेच्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पुणे विमानतळावर माण – हिंजवडी ते शिवाजीनगर पीएमआरडीए टाटा सिमेन्स मेट्रो मार्गाबाबतच्या आढावा बैठक पार पडली या बैठकीत ते बोलत होते.

महामेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नागरिकांना घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत येण्यासाठी पीएमपीएमएलची बससेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यास कमी वेळ लागल्यास नागरिकांचा प्रतिसाद वाढेल. त्यादृष्टीने स्थानकाजवळ वाहनतळाची सुविधा करण्यात यावी व मेट्रो सेवेला जोडणारी बससेवा प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. हा मेट्रोमार्ग सतत वाहनांची वर्दळ असणाऱ्या भागातून जात असल्यान शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासही मदत होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. पाटील यांनी मेट्रीमार्गिका 3 च्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.

मेट्रो मार्गिका उभारणीतील अडथळे दूर करून हा मार्ग अधिक लवकर पूर्ण होईल, असे नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली. शासन स्तरावर मेट्रोमार्गिकेसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कसा आहे हा माण – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो- मार्ग.

माण – हिंजवडी ते शिवाजीनगर हा सुमारे 24 किलोमीटर लांबीचा असून, या मार्गिकेत 23 स्थानके आहेत, त्यापैकी 16 स्थानकांचे काम सुरू आहे.

प्रकल्पाचा एकूण खर्च 8 हजार 313 कोटी आहे.

सर्वेक्षणाच्या अहवालानुसार या मार्गिकेच्या परिसरात दररोज 14 लाख नागरिक प्रवास करतात. या मार्गिकेमुळे प्रवाशांना शिवाजीनगर व सिव्हील कोर्ट येथे मार्गिका बदलून महामेट्रोच्या सेवेद्वारे शहराच्या इतर भागात जाता येणार आहे.

लिंक – माण – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो- मार्ग Route Map

प्रवासाचा एकूण वेळ फक्त 35 मिनिटे असल्याने नागरिकांच्या वेळेची बचत होऊ शकेल.

आतापर्यंत प्रकल्पाचे 45 टक्के काम पूर्ण झाले आहे.

हे आहेत 23 स्टेशन्स.. 

डेपो : मान गाव (20 हेक्टर)

मेगापोलिस सर्कल, अँबोसी क्वाड्रॉन बिझनेस पार्क, डोहलर, इन्फोसिस फेज II, विप्रो फेज II, पाल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, NICMAR, राम नगर, लक्ष्मी नगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, कृषिनगर , सकाळ नगर, विद्यापीठ, R.B.I., कृषी महाविद्यालय, शिवाजी नगर आणि दिवाणी न्यायालय..