Take a fresh look at your lifestyle.

मुलाखत द्या अन् थेट मिळवा सरकारी जॉब ; ‘या’ ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 96 जागांसाठी भरती…

शेतीशिवार टीम : 12 जुलै 2022 :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 96 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून कागदपत्रांसहित पात्र उमेदवारांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ , सोलापूर – 413 255 या पत्त्यावर उपस्थित राहायचं आहे.

पदाचे नाव :- सहाय्यक प्राध्यापक

रिक्त पदे :- 96 पदे

नोकरीचे ठिकाण :- सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाइन

अधिकृत वेबसाइट – http://su.digitaluniversity.ac/

निवड प्रक्रिया : मुलाखत .

मुलाखतीची तारीख : 25 जुलै 2022 ते 02 ऑगस्ट 2022 .

मुलाखतीची पत्ता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर – 413 255

शैक्षणिक पात्रता :-

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी NET / SET सहित मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतले असावे.

उमेदवार हे GPAT होल्डर असायला हवा.

उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असावं.

पगार :-

NET/SET आणि मास्टर डिग्री साठी :- 22,000/-

इतर उमेदवारांना :- 18,000/-

PDF जाहिरात – READ HERE