Take a fresh look at your lifestyle.

पुणे – नाशिक – नगरसह राज्यात 6 हजार 72 शेततळी पूर्ण ! 41 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा; असा करा ऑनलाईन अर्ज..

छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला शेततळे’ यामध्ये राज्यातील 23 हजार 524 शेततळ्यांना तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांनी पूर्वसंमती दिली असून, त्यामधील 6 हजार 72 शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. 

यात छत्रपती संभाजीनगर आणि लातूर विभाग मिळून संपूर्ण मराठवाड्यात एकूण 764 शेततळी पूर्ण झाली आहेत. यासाठी 41 कोटी 60 लाख रुपये अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना राज्यातील शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणींतून येणारे नैराश्य दूर करण्याच्या अनुषंगाने कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे मिळणारे विविध घटकांचे लाभ मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करून देण्यात येतात.

यामध्येच ‘मागेल त्याला शेततळे’ या घटकांतर्गत राज्यात 6 हजार 72 शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. मराठवाड्यातील 764 शेततळ्यांचा यात समावेश आहे.

विभागनिहाय शेततळी..

नाशिक विभागात 1 हजार 70, पुणे विभागात 2 हजार 902, कोल्हापूर विभागात 708, छत्रपती संभाजीनगर विभागात 474, लातूर विभागात 290, अमरावती विभागात 187 आणि नागपूर विभागात 287 कोकण विभागात 149 असे राज्यात 6 हजार 72 शेततळी पूर्ण करण्यात आली आहे.

या योजनेसाठी 41 कोटी 60 लाख 65 हजार 495 रुपये अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे.

तसेच अद्यापही ज्या शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी अर्ज करायचे आहेत, त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर त्वरित अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेततळ्यासाठी आता दीड लाखांचे अनुदान

असा करा ऑनलाईन अर्ज