Take a fresh look at your lifestyle.

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 : ‘या’ 25 सोप्या प्रश्नांतून तुम्हाला नेमके किती उत्तरे येतात ते पहा ; चेक करा तुमची GK लेव्हल…

प्रश्न 1 : भारतातील साहित्यिक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला गेलेला ‘ ज्ञानपीठ पुरस्कार ‘ __ पुरस्कृत केला आहे.
पर्याय :-
(1) भारत सरकारने
(2) महाराष्ट्र सरकारने
(3) भारतीय ज्ञानपीठ या सांस्कृतिक संघटनेने
(4) भारतीय विद्या भवनने

उत्तर :- (3) भारतीय ज्ञानपीठ या सांस्कृतिक संघटनेने

प्रश्न 2 : 6,328 चौ. किमी.क्षेत्रात पसरलेल्या मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये __महानगरपालिका आहेत.
पर्याय :-
(1) 18
(2) 11
(3) 9
(4) 14

उत्तर :- (3) 9

प्रश्न 3 : वांग यापिंग, या अलिकडेच अंतराळात चालून आलेल्या अंतराळवीर___नागरिक आहेत.
पर्याय :-
(1) चीनच्या
(2) दक्षिण कोरीयाच्या
(3) जपानच्या
(4) व्हिएतनामच्या

उत्तर :- (1) चीनच्या

प्रश्न 4 : प्रमुख भूमिकेतील अभिनेत्याचे 2021 चे ऑस्कर पारितोषिक __यांनी जिंकले.
पर्याय :-
(1) पॉल रासी
(2) अँडर्स हॅमर
(3) अँथनी हॉपकीन्स
(4) रीझ अहमद

उत्तर :- (3) अँथनी हॉपकीन्स

प्रश्न 5 : संयुक्त राष्ट्रांशी संबंधित संस्थेने चालवलेले ‘ ब्लु हार्ट अभियान ‘ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
पर्याय :-
(1) एड्स
(2) अमली पदार्थ
(3) देह व्यापार ( मानवी देह व्यापार )
(4) पूर मदत कार्य

उत्तर :- (2) अमली पदार्थ

प्रश्न 6: ‘अँन्थ्रोपोसिन’ या संज्ञेचा नेहमी वापर करणारे आणि 1995 साली ज्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले ते पॉल जे. क्रुटझन हे__चे नागरिक होते.
पर्याय :-
(1) नेदरलँड्स
(2) फ्रान्स
(3) जर्मनी
(4) पोलंड

उत्तर :- (1) नेदरलँड्स

प्रश्न 7 : 2020 चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या कादंबरीला मिळाला आहे ?
पर्याय :-
(1) दी सेलऑकट
(2) शुगी बेन
(3) दी लुमिनरीज
(4) ब्रिंग अप दी बॉडीज

उत्तर :- (2) शुगी बेन

प्रश्न 8 : 2020 च्या मानवी विकास अहवालात (युएनडीपी तर्फे प्रसिद्ध झालेल्या मानवी विकास आणि यांच्यामधील संबंधांवर भर दिलेला आहे.
पर्याय :-
(1) होलोसीन
(2) अँथ्रोपोसीन
(3) मायोसीन
(4) इओसीन

उत्तर :- (2) अँथ्रोपोसीन

प्रश्न 9 : 2021 साली नोबेल शांतता पारितोषिक प्राप्त झालेल्या मारीया रेसा यांनी ‘ रॅपलर ‘ नावाची __ आहे स्थापन केली.
पर्याय :-
(1) संगीत कंपनी
(2) साहित्यिक संघटना
(3) स्त्रीवादी संघटना
(4) शोध पत्रकारितेसाठीची डीजिटल माध्यम कंपनी

उत्तर :- (4) शोध पत्रकारितेसाठीची डीजिटल माध्यम कंपनी

प्रश्न :10: “चंदीगडची चमत्कारी आई” (मिरॅकल मॉम फ्रॉम चंदीगड) म्हणून कोणाला ओळखले जाई?
पर्याय :-
(1) निरजा भानोत
(2) सोफिया दुलिप सिंग
(3) रानी सदा कौर
(4) मन कौर

उत्तर :- (4) मन कौर

प्रश्न 11 : खालीलपैकी अमेरिकेतील कोणत्या राज्याने 1 नोव्हेंबर 2021 रोजी ‘कन्नड भाषा आणि राज्योत्सव दिवस’ साजरा केला ?
पर्याय :-
(1) कॅलिफोर्निया
(2) टेक्सास
(3) साऊथ कॅरोलिना
(4) जॉर्जिया

उत्तर :- (4) जॉर्जिया

प्रश्न 12 : 2019 मध्ये झटपट तिहेरी तलाकला फौजदारी गुन्हा ठरवणारा कायदा संमत झाला . तेव्हापासून भारतात_ हा दिवस ‘ मुस्लीम महिला हक्क दिन ‘ म्हणून साजरा केला जातो .
पर्याय :-
(1) 1 ऑगस्ट
(2)15 जानेवारी
(3) 15 ऑगस्ट
(4) 26 जानेवारी

उत्तर :- (1) 1 ऑगस्ट

प्रश्न 13 : भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (C.P.I.M) ची स्थापना केव्हा झाली ?
पर्याय :-
(1) 1956
(2) 1986
(3) 1946
(4) 1964

उत्तर :- (4) 1964

प्रश्न 14 : शपथा किंवा प्रतिज्ञांचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या _ अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
पर्याय :-
(1) दहाव्या
(2) सहाव्या
(3) तिसऱ्या
(4) पहिल्या

उत्तर :- (3) तिसऱ्या

प्रश्न 15 : महाराष्ट्र विधान परिषदेला __ मध्ये 50 वर्षे पूर्ण झाली.
पर्याय :-
(1) 1990
(2) 2010
(3) 1987
(4) 2000

उत्तर :- 1987

प्रश्न 16 : भारतीय राज्यघटनेतील 1992 च्या 74 व्या घटनादुरुस्ती कायद्याप्रमाणे शहरी भारतात __ प्रकारच्या नगरपालिका आहेत .
पर्याय :-
(1) दोन
(2) तीन
(4) पाच
(3) चार

उत्तर :- (2) तीन

प्रश्न 17 : जम्मू आणि काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व कोणत्या दिवशी संपले.
पर्याय :-
(1) 31 ऑक्टोबर 2019
(2)31 डिसेंबर 2019
(3) 15 ऑगस्ट 2019
(4) 1 जानेवारी 2020

उत्तर :- 31 ऑक्टोबर 2019

प्रश्न 18 :राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत ‘सशस्त्रबंड’ हा शब्द कधी जोडला गेला ?
पर्याय :-
(1) 44 व्या घटनादुरुस्तीने
(2) 42 व्या घटनादुरुस्तीने
(3) 40 व्या घटनादुरुस्तीने
(4)38 व्या घटनादुरुस्तीने

उत्तर :- (1) 44 व्या घटनादुरुस्तीने

प्रश्न 19 : सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांच्या संदर्भात असलेल्या 2021 च्या 105 व्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानाच्या कामांमध्ये बदल केले आहेत.
पर्याय :-
(1) दोन
(2) चार
(3) पाच
(4) तीन

उत्तर :- (4) तीन

प्रश्न 20 : हा सौम्य क्षपणक आहे. जो फक्त कार्बोनिल गटाचे क्षपण इतर गट उदा . नायट्रो , कार्बोविझल , इस्टर , दुहेरी बंध असताना करतो .
पर्याय :-
(1) Lialh4,
(2) Na – NH4,
(3) NaBH4
(4) H½ – Ni

उत्तर :- 3) Nabh4

प्रश्न 21 : रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे __
पर्याय :-
(1) वेळेनुसार संपूर्णपणे स्थिर रहातो
(2)सुरुवातीला कमी असतो आणि वेळेसह वाढत जातो
(3) सुरुवातीला जास्त असतो आणि वेळेसहमी होत जातो
(4) असे सर्वसाधारण विधान केले जाऊ शकत नाही

उत्तर :- (3) सुरुवातीला जास्त असतो आणि वेळेसहमी होत जातो.

प्रश्न 22 : कोणाची आयनन ऊर्जा (IE) सर्वात जास्त आहे?
पर्याय :-
(1) Mg
(2) Mg+
(3) Mg2+
(4) वरीलपैकी सर्व

उत्तर :- (3) Mg2+

प्रश्न 23 : मानवाच्या पोटामध्ये कोणते जठररस स्रवतात ?
पर्याय :-
(1) पेप्सिन आणि ट्रिप्सिन
(2) ट्रिप्सिन आणि हायड्रोक्लोरिक आम्ल
(3) हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन
(4) अमायलोप्सिन आणि पेप्सिन

उत्तर :- (3) हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन

प्रश्न 24 : खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही ?
पर्याय :-
(1) केलव्हिन सायकल
(2) ग्लायकोलीसिस
(3) इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन
(4) सायट्रिक अँसिड सायकल

उत्तर :- (1) केलव्हिन सायकल

प्रश्न 25 : इकॉलॉजी (Ecology) हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाद्वारे शोधण्यात आला?
पर्याय :-
(1) चार्लस् क्रेब्ज
(2) अर्नस्ट हेनरीच हॅकेल
(3) ए.जी. टॅन्सली
(4) व्हीक्टर शेफर्ड

उत्तर :- (2) अर्नस्ट हेनरीच हॅकेल

प्रश्न 26 : खालीलपैकी कोणत्या पेशी घटका भोवती पटल (आवरण) नसते ?
पर्याय :-
(1) क्लोरोप्लास्ट
(2) रायबोझोम
(3) मायटोकॉन्ड्रिया
(4) लायसोझोम

उत्तर :- (2) रायबोझोम