Take a fresh look at your lifestyle.

GK Questions : भारताचे, “INDIA” हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनलं आहे ?

UPSC / MPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा आहे. जे उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आणि जो या परीक्षेत उत्तीर्ण होतो तो देशाचा (IAS) अधिकारी होतो. या परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत. ज्यामध्ये लेखी बरोबर इंटरव्हिव्ह हि घेतला जातो. प्रत्येकजण लेखी परीक्षा पास तर होतो पण इंटरव्हिव्ह मध्ये अडकतात.

खरं तर असे अनेक प्रश्न या UPSC / MPSC इंटरव्यू दरम्यान विचारले जातात. ज्याची उत्तरे प्रत्येकाच्या डोक्यात बसत नाहीत. हे प्रश्न खूप गुंतागुंतीचे आणि गुंफलेले असतात. भल्याभल्यांचं मन हेलावतं. तर आज आम्ही या पोस्टमध्ये तुमच्यासाठी असेच काही प्रश्न घेऊन आलो आहोत जे तुम्हाला इंटरव्हिव्ह मध्ये अन् परीक्षेमध्ये खूप मदत करू शकतात.

प्रश्न 1 : हृदयरोपण शास्त्रक्रिया भारतात प्रथम कोणी केली ?
उत्तर : डॉ.पी.के. सेन

प्रश्न 2 : T20 मध्ये 1000 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण ?
उत्तर : ख्रिस गेल हा T20 मध्ये 1000 षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू आहे.

प्रश्न 3 : असा कोणता देश आहे, जो आपला स्वातंत्र्यदिन साजरा करत नाही ?
उत्तर : ‘नेपाळ’ आणि ऑस्ट्रेलिया असा देश आहे जिथे लोक कधीही त्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा करत नाहीत. कारण नेपाळ हा असा देश आहे, जो कधीही दुसऱ्या देशाचा गुलाम झाला नाही.

प्रश्न 4 : इंडिया गेटचं डिझाईन कोणी केलं होतं ?
उत्तर : इंडिया गेटची डिझाईन ‘एडविन लॅड्सियर लुटियन्स’ (Edwin Ladsier Lutyens) यांनी केलं होतं. इंडिया गेटचं बांधकाम 1931 मध्ये पूर्ण झालं अन् सुरुवातीला त्याला ‘ऑल इंडिया वॉर मेमोरियल’ असं नाव देण्यात आलं होतं.

प्रश्न 5 : भारतातील पहिला 3D चित्रपट कोणता आहे ?
उत्तर : या चित्रपटाचं नाव आहे, ‘माय डिअर गुड्डीचाथन’ (My dear Guddichathan). हा चित्रपट 1984 साली मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला होता. आणि हाच चित्रपट 1998 साली हिंदी व्हर्जनमध्ये प्रदर्शित झाला होता.

प्रश्न 6 : भारताचे, “INDIA” हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनलं आहे ?
उत्तर : इंडस (Indus) शब्दापासून, इंडस हे एका नदीचे नाव असून या नदीला संस्कृतमध्ये सिंधू नदी असे म्हटले जाते.

प्रश्न 7 : असा कोणता पक्षी आहे जो हात लागताच मरण पावतो ?
उत्तर :  टिटोनी पक्षी

प्रश्न 8 : कोळशाचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता आहे?
उत्तर : चीन (China) गेल्या तीन दशकांत चीन हा सर्वात मोठा कोळसा उत्पादक देश आहे. देशाने 2012 मध्ये सुमारे 3.6 अब्ज टन (BT) कोळशाचे उत्पादन केलं, जे जगातील एकूण कोळसा उत्पादनाच्या 47% पेक्षा जास्त आहे.

प्रश्न 9 : 100 रुपयांच्या नोटेवर किती भाषा लिहिलेल्या आहेत ?
उत्तर : 17

प्रश्न 10 : कोणत्या देशात च्युइंग खाण्यावर बंदी आहे ?
उत्तर : सिंगापूर

प्रश्न 11 : ‘देवी’ या रोगावर लस कोणी शोधून काढली ?
उत्तर : एडवर्ड जेन्नर

प्रश्न 12 : सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात ?
उत्तर : 72

प्रश्न 13 : मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ?
उत्तर : 37 अंश सेल्सिअस

प्रश्न 14 : जगातील ‘पहिली टेस्ट-ट्यूब’ केव्हा व कोठे जन्मास आली ?
उत्तर : 1978, इंग्लड

प्रश्न 15 : असा कोणता जीव आहे, जो जन्माला येताच आपल्या आईला मारतो ?

उत्तर : ‘विंचू’ (Scorpion) हा असा जीव आहे, जो त्याच्या आईला कधीही पाहू शकत नाही… कारण त्याच्या जन्मासोबतच त्याची आई मरण पावते.