Take a fresh look at your lifestyle.

Farmer Scheme : शेतकऱ्यांनो, मळणी यंत्रासाठी मिळतंय 2.50 लाखांपर्यंत अनुदान ! मोबाईलवरून असा करा ऑनलाईन अर्ज..

शेतकऱ्यांना निम्म्याहुन कमी दरात कृषी अवजारे व यंत्रे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाकडून अनेक फायदेशीर योजना राबवल्या जात आहे. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना, कृषी अवजारे पुरवठा योजना आहे, सिंचन साधने आणि सुविधा योजना इत्यादी नावाने योजना चालवल्या जात आहेत. या लेखामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना मल्टिपक थ्रेशर आणि रिव्हर्सिबल नांगरणी कृषी उपकरणे / यंत्रे अर्ध्या किमतीत दिली जात आहेत.

याआधी 29 डिसेंबर 2023 लॉटरी काढण्यात आली असून प्राधान्यक्रमाच्या आधारे निवड झालेल्या पात्र शेतकऱ्यांची यादी कृषी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजना यादीत त्यांचे नाव तपासून शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मॅसेज प्राप्त झाले आहे. यासाठी आता जानेवारी 2024 पासून नव्याने अर्ज कृषी विभागामार्फत मागविण्यात आले आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत रोजी मल्टीक्रॉप थ्रेशर आणि रिव्हर्सिबल प्लोसाठी अर्ज मागवले आहे.

मल्टी कॉप थ्रेशर (बहुपीक मळणी यंत्र) / एक्सियल फ्लो पॅडी थ्रेशर (35 बीएचपी वरील)
मल्टीकॉप थ्रेशर / एक्सियल फ्लो पॅडी थ्रेशर (4 टन / तास पेक्षा जास्त क्षमता)
रिव्हर्सिबल प्लाऊ / मेकॅनिकल / हायड्रॉलिक.

या योजनेंतर्गत लॉटरीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना मल्टी कॉप थ्रेशर आणि रिव्हर्सिबल प्लाऊवर अनुदानाचा लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसह अत्यंत मागासवर्गीय शेतकऱ्यांना 55 टक्के पर्यंत अनुदान दिले जाईल. तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदानाचा लाभ दिला जातो ते 30 हजारांपासून ते 2.30 लाखांपर्यंत आहे.

अनुदानाची नेमकी रक्कम जाणून घेण्यासाठी शेतकरी कृषी यांत्रिकीकरण पोर्टलवर दिलेल्या कॅल्क्युलेटरचा वापर करू शकतात. याद्वारे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे खरेदीसाठी किती अनुदान मिळणार आहे, हे कळू शकते. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी उपकरणांवर दिले जाणारे अनुदान हे कृषी उपकरणांच्या किमतीच्या आधारे निश्चित केले जाते, जे खालीलप्रमाणे आहे.

कोणत्या कृषी यंत्रांना किती अनुदान ते पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा

कृषी यांत्रिकरण योजनेसाठी अर्ज कसा कराल ?

1) सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर क्लीक करा :- लिंक – mahadbt.maharashtra.gov.in

2) यानंतर ‘एक शेतकरी एक अर्ज’ म्हणजे युजर आयडी आणि पासवर्ड किंवा नवीन युजर्ससाठी आधार कार्ड आणि ओटीपी टाकून लॉगिन करा.

3) ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाब निवडायची आहे ‘कृषीयांत्रिकीकरण’ या ऑप्शनवर क्लिक करा..

4) त्यानंतर नवं पेज ओपन होईल, यामध्ये वैयक्तिक तपशील आणि इतर सर्व माहिती व्यवस्थित भरावी जसे की, गाव, तालुका, मुख्य घटकमध्ये ‘कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य…(खाली दिलेली इमेज पहा )

5) तपशील मध्ये ‘ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे’ निवडा, यानंतर ‘एच पी श्रेणी’ मध्ये किंवा ’35BHP पेक्षा जास्त’ हा ऑप्शन निवडा. (तुम्हाला जे हवंय ते)

6) यंत्रसामग्रीमध्ये ‘मळणी यंत्र’ यावर क्लिक करा, पुढे मशीनचा प्रकारामध्ये ‘बहुपीक मळणी यंत्र 4 टनापर्यंत क्षमता’ वर क्लिक करा.

7) त्यानंतर पूर्वसंमती द्या आणि ‘जतन करा’ वर क्लिक करा.( तुमच्याकडे ट्रॅक्टर – पॉवर टिलर असणे गरजेचे आहे)

8) जतन केल्यानंतर तुम्हाला पुन्हा होमपेजवर ‘अर्ज सादर करा’ या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल, त्यानंतर निवडलेल्या बाबींना प्राधान्यक्रम द्या अन् ‘अर्ज सादर करा’ वर क्लिक करा.

9) यानंतर तुम्हाला पेमेंट च्या पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल, तिथे तुम्हाला 23.60 रुपयांचं पेमेंट करावं लागेल. असा पद्धतीने तुमचा अर्ज सबमिट होईल.

लॉटरी लागल्यानंतर आवश्यक कागदपत्रे..

आधार कार्ड
7/12 उतारा
8 अ दाखला
अवजाराचे कोटेशन
तपासणी अहवाल..
जातीचा दाखला ( अनु.जाती व अनु. जमाती साठी )
स्वयं घोषणापत्र
पूर्वसंमती पत्र