Take a fresh look at your lifestyle.

Pune : वाघोली ते शिरूर PMPML बससेवा सुरु, पहा वेळापत्रक अन् तिकीट दर..

वाघोली ते शिरूर अशी पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याबाबात शिरुर – हवेलीतील अनेक बसप्रवाशांच्या मागणीची दखत घेत आमदार अशोक पवार यांनी दिवाळीच्या ऐन मुहूर्तावर वाघोली ते शिरूर शासकीय विश्रामगृह अशी थेट बससेवा सुरू करुन शिरुर हवेलीतील प्रवाशांना दिवाळी गिफ्ट दिले आहे.

बसने सकाळीच स्वत : प्रवास करुन आमदार अशोक पवार यांनी सणसवाडी (ता.शिरूर) येथे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर यांच्या पुढाकाराने चालक वाहकांचा गुलाबपुष्प व मिठाई देत सत्कार करून बससेवेचे स्वागत केले. या थेट बससेवेमुळे शेतकरी, व्यापारी, रुग्ण विद्यार्थी कामगार वर्गासह सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या बससेवेचा आढावा व सर्वसामान्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी स्वतः तिकीट काढून या बसने शिरूरपर्यंत प्रवास करत प्रवाशाशीही संवाद साधला. यावेळी अनेकांनी अनेक दिवसांची मागणी असलेल्या या बससेवेचा नागरीकाना मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले.

शिरुर मधील नागरीकांना तसेच विद्यार्थी व कामगारांना पुण्यात जावे लागते. तर पुण्यातील अनेकांना शिरुरपर्यंत कामानिमित्त यावे लागते. या सर्वांची अनेक बस बदलताना होणारी दमछाक वाया असल्याच्याही प्रतिक्रिया नागरिकांनी यावेळी आमदार जाणारा वेळ वाचणार अशोक पवार यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केल्या.

नागरिकांना दिलासा व ग्रामीण विकासालाही चालना सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असलेल्या उत्तम दर्जेदार नागरी सेवासुविधांपैकी बससेवा ही अत्यंत महत्वाची सेवा असून वाघोली ते शिरूर या दरम्यान पीएमपीएलची थेट बससेवा उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळून ग्रामीण विकासालाही चालना मिळणार असल्याचे मत यावेळी आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.

या स्वागतप्रसंगी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, कांग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, माजी चेअरमन सुहास दरेकर, संचालक सुदीप गुंदेचा, विजय गव्हाणे, निलेश दरेकर सुभाष दरेकर, अशोक ढेरंगे, शाम दरेकर, प्रकाश बाबर, बिजवत शिंदे, आदीसह अनेक पदाधिकारी ग्रामस्थ व प्रवाशी उपस्थित होते.