Take a fresh look at your lifestyle.

CMEGP : उद्योजक होण्याचे स्वप्न होतंय पूर्ण..! 50 लाखांच्या कर्जावर मिळतंय 17.50 लाखांचे अनुदान, पहा ऑनलाईन अर्ज प्रोसेस..

0

सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्यासोबतच त्यांचे उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम उपयुक्त ठरत आहे. या दोन्ही योजनेतून तब्बल 50 लाखांपर्यंतच्या उद्योग, व्यवसायासाठी कर्ज प्रकरण मंजूर केले जातात. यासाठी प्रकल्प किमतीच्या 35 टक्के अनुदान दिले जाते. (Chief Minister Employment Generation Programe)

50 लाखांचा प्रकल्प असल्यास तब्बल 17 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान मिळत असल्याने अनेक नवउद्योजक या योजनेतून निर्माण होत आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, कार्यक्रमांतर्गत उत्पादन स्वरुपाच्या प्रकल्पासाठी 50 लाख तर सवा प्रकारच्या व्यवसायासाठी 20 लाखांपर्यंत कर्ज प्रकरण मंजूर केले जाते.

योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे वय 18 ते 45 वयोगटातील असावे लागते. विशेष प्रवर्गाकरिता लाभार्थ्यांकरिता 5 वर्षांची सूट आहे. रुपये 10 लाखापर्यंतच्या प्रकल्पासाठी शिक्षणाची अट नाही. दहा लाखांवरील प्रकल्पांसाठी लाभार्थी किमान सातवी पास असावा तर रुपये 25 लाखांवरील प्रकल्पांसाठी लाभार्थी दहावी पास असणे आवश्यक आहे. (CMEGP)

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उत्पादन स्वरुपाच्या प्रकल्पासाठी 50 लाख तर सेवा प्रकारच्या व्यवसायासाठी 20 लाखापर्यंत कर्ज प्रकरण मंजूर केले जाते . या योजनेच्या लाभासाठी लाभाथ्यांचे वय 18 वर्ष पूर्ण झालेले असावे. 10 लाखावरील प्रकल्पांसाठी शिक्षण आठवी पास तर 10 लाखांपर्यंतच्या प्रकल्पासाठी शिक्षणाची अट नाही.

या दोन्ही योजनेतून सर्वसाधारण लाभार्थ्यास प्रकल्प किमतीच्या 10 टक्के स्वगुंतवणूक करावी लागते. बँकेमार्फत 90 टक्के कर्ज उपलब्ध होते. प्रकल्प किमतीच्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यास 25 टक्के तर शहरी भागातील लाभार्थ्यास 15 टक्के अनुदान दिले जाते.

अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक या लाभार्थ्यास केवळ 5 टक्के स्वगुंतवणूक करावी लागते. या लाभार्थ्यांना बँकेमार्फत 95 टक्के कर्ज मंजूर केले जातात. तसेच ग्रामीण लाभार्थी 35 तर शहरी लाभार्थ्यांस 25 टक्क अनुदान दिले जाते.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभाथ्यांस संबंधित संकेतस्थळावर तर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज प्रकरणासाठीही संबंधित संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावे लागतात .

सुधारित बीज भांडवल योजना..

सुधारित बिज भांडवल योजनेंतर्गतही सुशिक्षित बेरोजगार युवकांना आपल्या पायावर उभे राहता यावे, यासाठी कर्ज प्रकरणे मंजूर केले जातात.

या योजनेसाठी अर्जदार किमान सातवी पास असावा, उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षे या दरम्यानचे असावे.

लाभार्थी बेरोजगार असावा. या योजनेतून 10 लाखांपर्यंत व 25 लाखांपर्यंतची कर्ज प्रकरणे मंजूर केली जातात.

बीज भांडवलाच्या रक्कमेवर 6 टक्के व्याज आकारले जाते. परतफेड नियमितपणे केल्यास व्याजात 3 टक्के सुट दिली जाते.

CMEGP योजनेसाठी अर्ज कसा कराल ?

सर्वप्रथम maha-cmegp.org.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

मुख्य पृष्ठावर, “व्यक्तीसाठी ऑनलाइन अर्ज” वर क्लिक करावे लागेल.

डायरेक्ट लिंक – शासन निर्णय PDF 

कोणत्या उद्योगांसाठी मिळणार कर्ज.. सेवा उद्योगांची यादी..

थ्रेड बॉल आणि वूल बॉलिंग लॅशेस बनवणे
कपडे उत्पादन
कपडे धुऊन मिळण्याचे ठिकाण
नाई
प्लंबिंग
डिझेल इंजिन पंपांची दुरुस्ती
स्प्रेअरसाठी टायर व्हॅलेन्स युनिट कृषी सेवा
बॅटरी चार्जिंग
आर्ट बोर्ड पेंटिंग / स्प्रे पेंटिंग
सायकल दुरुस्तीची दुकाने
बँड पथक
मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती
इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुरुस्ती
ऑफिस प्रिंटिंग आणि बुक बाइंडिंग
काटेरी तारांचे उत्पादन
इमिटेशन ज्वेलरी (बांगड्या) उत्पादन
स्क्रू उत्पादन
ENGG कार्यशाळा
स्टोरेज बॅटरी उत्पादन
जर्मन भांडी उत्पादन
रेडिओ उत्पादन
व्होल्टेज स्टॅबिलायझरचे उत्पादन
कोरलेली लाकूड आणि कलात्मक फर्निचर बनवणे
ट्रंक आणि बॉक्स उत्पादन
ट्रान्सफॉर्मर / ELCT. मोटर पंप / जनरेटर आउटपुट
संगणक असेंब्ली
वेल्डिंग काम
वजन कमी उत्पादन
सिमेंट उत्पादने
विविध साहित्य हाताळणी उपकरणे तयार करणे
मशिनरी स्पेअर पार्ट्सचे उत्पादन
मिक्सर ग्राइंडर आणि इतर घरगुती वस्तू बनवणे.
प्रिंटिंग प्रेस / स्क्रीन प्रिंटिंग
पिशवी उत्पादन
मंडप सजावट
गादी कारखाना
कॉटन टेक्सटाईल फॅब्रिक्समध्ये स्क्रीन प्रिंटिंग
झेरॉक्स सेंटर
चहा शॉप
मिठाई उत्पादने
होजरी उत्पादन
तयार कपड्यांचे शिवणकाम / उत्पादन
खेळणी आणि बाहुल्या बनवणे
छायाचित्रण
डिझेल इंजिन पंप संच दुरुस्ती
मोटर रिवाइंडिंग
वायर नेट बनवणे
घरगुती अॅल्युमिनियम भांडी तयार करणे
पेपर पिन उत्पादन
शोभेच्या बल्बचे उत्पादन
हर्बल ब्युटी पार्लर / आयुर्वेदिक हर्बल उत्पादने
केबल टीव्ही नेटवर्क / संगणक केंद्र
सार्वजनिक वाहतूक / ग्रामीण परिवहन सेवा
रेशमी साड्यांचे उत्पादन
रसवंती
चटई बनवणे
फायबर वस्तूंचे उत्पादन
पिठाची चक्की
कप बनवणे
लाकडी काम
स्टील ग्रिल बांधकाम
जिम सेवा
आयुर्वेदिक औषधी उत्पादन
फोटो फ्रेम
पेप्सी युनिट / कोल्ड / सॉफ्ट ड्रिंक
खवा आणि चक्क युनिट्स
गूळ तयार करणे
फळे आणि भाजीपाला प्रक्रिया
तेल उद्योग
पशुधन खाद्य
नाडी गिरणी
तांदूळ गिरणी
मेणबत्ती उत्पादन
तेल उत्पादन
शैम्पूचे उत्पादन
केसांच्या तेलाचे उत्पादन
पापड मसाला उद्योग
ICE / ICE CANDY चे उत्पादन
बेकरी उत्पादने
पोहे उत्पादन
मनुका / बेरी उद्योग
सोन्याचे दागिने उत्पादन
चांदीचे काम
स्टोन क्रशरचा व्यवसाय
स्टोन कटिंग पॉलिशिंग
मिरची कांडप केंद्र ..

Leave A Reply

Your email address will not be published.