Take a fresh look at your lifestyle.

BREAKING : मुंबईत Coronaचा पुन्हा स्फोट ; 24 तासांत आढळले तब्बल ‘इतके’ नवे रुग्ण !

शेतीशिवार टीम, 4 जानेवारी 2022 : देशात कोरोनाचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दिल्ली आणि मुंबईतील कोरोनाची आकडेवारी भयावह आहे. मुंबईत आज मंगळवारी 10860 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. या शिवाय 2 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.तसेच गेल्या 24 तासात दिल्लीतही 5481 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मंगळवारी मुंबईत 10860 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या 24 तासात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह, मुंबईत कोरोनाचे 47476 अँक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत.

तर आज संपूर्ण राज्यात 18 हजार 466 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून आज 4 हजार 558 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहे. राज्यात आज गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईसह राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. आज, मंगळवारी Omicron व्हेरियंटची आकडेवारी ही धडकी भरवणारी आहे. आज राज्यात 75 Omicron रुग्ण आढळले असून एकट्या मुंबईत 40 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

नव्या गाईडलाईन्स जारी…

मुंबईतील कोरोनाचं वाढतं संकट नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबईतील गृहनिर्माण संस्था आणि इमारतींबाबत नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. गाईडलाईन्सनुसार, इमारतीच्या कोणत्याही मजल्यावर अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आढळल्यास तो संपूर्ण मजला सील केला जाणार आहे. कोरोनाचे दहा रुग्ण आढळल्यास किंवा मोठ्या सोसायट्या आणि उंच इमारतींमधील 20% घरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले तर संपूर्ण इमारत सील केली करण्यात येणार आहे.

पुण्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय :-

पुणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग 30 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शालेय वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहे.

याआधी सोमवारी राज्यात कोरोना व्हायरसचे 12160 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी, एकट्या मुंबई शहरात कोरोनाचे 8,082 नवीन रुग्ण आढळून आले, जी गेल्या वर्षी 18 एप्रिलनंतर कोणत्याही एका दिवसातील उच्चांकी पातळी होती. या आजारामुळे आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.