Take a fresh look at your lifestyle.

Corona Upadate : मुंबईत Coronaचा तर पुण्यात Omaicronचा स्फोट ; दिवसभरात आढळले तब्बल इतके नवे रुग्ण…

शेतीशिवार टीम, 2 जानेवारी 2022 : राज्याची राजधानी मुंबईमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढली आहे. गेल्या 24 तासात मुंबई शहरात कोरोनाचे 8036 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या आता थेट 30 हजारांवर पोहोचली आहे.

आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी मुंबई शहरात कोरोना व्हायरसचे 6,347 रुग्ण आढळले होते. कालच्या तुलनेत आज सुमारे 1700 नवे रुग्ण आढळले आहेत. परंतु आज मुंबईत एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब आहे.

आज नोंदवलेल्या 8036 रुग्णांपैकी 7176 अशी आहेत ज्यात कोरोनाची कोणतीच लक्षणे दिसून आलेली नाहीत, म्हणजे ती लक्षणे नसलेली रुग्ण आहेत. केवळ 503 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता पडली.

तर आज संपूर्ण राज्यात 11 हजार 877 नवे कोरोना रुग्ण आढळले असून आज कोरोना रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 69 कोरोना रुग्ण आज कोरोनमुक्त होऊन घरी परतले आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सांगितले होतं की, आतापर्यंत राज्यातील दहाहून अधिक मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे.

पुण्यात Omaicronचा स्फोट :-

राज्यात आज 50 नवे Omaicronचे रुग्ण आढळले असून एकट्या पुण्यात आज 36 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात Omaicron बाधितांचा आकडा थेट 510 वर पोहोचला आहे.

यापैकी पुणे महापालिकेच्या हद्दीत आज सर्वाधिक 36 रुग्ण आढळले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये 8, पुणे ग्रामीण 02, सांगली 02, ठाणे आणि मुंबईमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.

राज्यात निर्बंध होणार आणखी कडक :-

राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णवाढ सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे. या स्फोटक वाढीला आला घालण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून राज्यातले आणि मुंबईतले निर्बंध आणखी कडक केले जाण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका ओळखून राज्य शासनाने काही निर्बंध लागू केले आहेत, मात्र तरीरी रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंध आणखी कडक केले जाण्याची शक्यता आहे.

बघा मुंबईत रुग्णवाढ कशी बदलत चाललीये…

21 डिसेंबर : 327
22 डिसेंबर : 490
23 डिसेंबर : 602
24 डिसेंबर : 683
25 डिसेंबर : 757
26 डिसेंबर : 922
27 डिसेंबर : 809
28 डिसेंबर : 1377
29 डिसेंबर : 2510
30 डिसेंबर : 3671
31 डिसेंबर : 5428
1 जानेवारी : 6347
2 जानेवारी : 8063