Take a fresh look at your lifestyle.

BREAKING : चिंताजनक ! राज्यात कोरोनाची तिसरी लाट धडकली ? एकट्या मुंबईत कोरोनाचे तब्बल 2500 हुन अधिक रुग्ण ; तर राज्यात…

शेतीशिवार टीम, 29 डिसेंबर 2021 : आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बुधवारी मुंबई शहरातच कोरोनाचे 2510 नवीन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे.

याआधी मंगळवारी मुंबई शहरात कोरोनाचे 1300 हून अधिक नवे रुग्ण आढळले होते. तर संपूर्ण राज्यात आज दिवसभरात तब्बल 3 हजार 900 कोरोना रुग्ण आढळले आहेत. अशाप्रकारे राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे.

राज्यात Omicron विस्फोट :-

राज्यात Omicron चा विस्फोट झाला असून एकट्या मुंबईत Omicron चे 34 रुग्ण आढळून आले तर राज्यात आज 87 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 43 रुग्णांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला असून त्यांच्या सहवासातून 4 जणांना बाधा झाली आहे. 37 जणांचा कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास नसून त्यांनाही लागण झाली आहे.

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे. सरकारने लोकांना कोविड प्रोटोकॉलचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. यासोबतच नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. बंद सभागृहातील कार्यक्रमांना 50% क्षमतेपर्यंत भरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

खुल्या जागांवर कार्यक्रमांसाठी 25 टक्के क्षमतेची परवानगी आहे. लोकांना समुद्रकिनारे आणि उद्यानात जमणे टाळण्यास सांगितले आहे. गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाइन्स, गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटीवर गर्दी करू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.