Take a fresh look at your lifestyle.

तज्ञांचा इशारा : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच Omicron मुळे येणार तिसरी लाट ; पण…

शेतीशिवार टीम,18 डिसेंबर 2021 :- सध्या देशात दररोज 8 हजारांहून कमी कोरोनाचे नवे रुग्ण आढळतं आहे. मात्र लवकरच ही संख्या वाढू शकते. नॅशनल Covid-19 सुपर मॉडेल समितीने असं मूल्यांकन केलं आहे की, पुढील वर्षाच्या सुरुवातीला Omicron मुळे कोरोना संसर्गाची तिसरी लाट येऊ शकते.

फेब्रुवारीमध्ये मध्ये ती शिखरावर असेल. या समितीचे प्रमुख विद्यासागर म्हणाले की, कोरोनाचा नवा व्हेरियंट Omicron भारतात तिसरी लाट आणणार, मात्र ती दुसऱ्या लाटेपेक्षा हलकी असेल.

ANI शी बोलताना ते म्हणाले की, पुढील वर्षाच्या सुरुवातीला तिसरी लाट येऊ शकते. देशात मोठ्या प्रमाणात प्रतिकारशक्ती असल्यामुळे दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट सौम्य असणार आहे, मात्र तिसरी लाटेला सध्या कोणी रोखू शकणार नाही…

सध्या, आपल्या देशात दररोज सुमारे 7,500 रुग्ण आढळत आहे. परंतु जेव्हा डेल्टा व्हेरियंट प्रभावीपणे Omicron मध्ये बदलला जाईल तेव्हा ही संख्या लाखांवरही जाण्याची शक्यता आहे.

विद्यासागर पुढे म्हणाले की, सेरो सर्वेक्षणानुसार, डेल्टा व्हायरसच्या संपर्कात न आलेले लोक फार कमी आहेत. ते म्हणाले, “आता आमचा सेरो-प्रचलन 75 ते 80% आहे, 85 टक्के प्रौढांना लसींचा पहिला डोस मिळाला आहे, 55 टक्के लोकांना दोन्ही लसी मिळाल्या आहेत.

 

त्यामुळे तिसऱ्या लाटेतील दैनंदिन प्रकरणे दुसऱ्या लाटेसारखी दिसणार नाहीत. त्या अनुभवाच्या आधारे आम्ही आमची क्षमताही तयार केली आहे, त्यामुळे आम्हाला या लाटेवर मात करण्यास अडचण येणार नाही..

देशातील Omicron ची स्थिती :-

देशातील Omicron व्हेरियंटच्या कोरोनाबाधितांची संख्या 108 च्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे की, Omicron व्हेरियंट हा आत्तापर्यंत 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला असून micron चे आता देशभरात 101 रुग्ण झाले आहेत. यापैकी सर्वाधिक 40 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळले आहेत.