शेतकरी शेतीनंतर, भारतात उत्पन्नासाठी सर्वात जास्त पशुपालनावर अवलंबून असतात. जास्त तर ग्रामीण भागात शेतकरी शेतीसोबतच गाय,किंवा म्हैस पाळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेणखत शेतासाठी सहज उपलब्ध होते. दुसरीकडे, शेतकरी दूध विकून मोठा नफा मिळवू शकतात.

परंतु शेतकरी बऱ्याचवेळा तक्रार करतात की, त्यांची जनावरे फारच कमी दूध देतात. यामुळे त्यांचा बरकत लगेच कमी होतो. जनावरांना योग्य चारा न दिल्याने आणि योग्य काळजी न घेतल्याने कमी दूध यासारख्या समस्या दिसून येतात, असे पशु विभाग शेतकरी सांगत असतात. अशा परिस्थितीत पशुखात्याकडून शेतकऱ्यांना चवळी (Cowpea) चारा लागवडीचा सल्ला देण्यात येत आहे. चवळी म्हैस तसेच गाईंसाठी खूप फायदेशीर आहे.

जेव्हा गाईचं दूध उत्पादन क्षमता कमी होते, तेव्हा शेतकरी पूरक आहार वापरण्यास सुरुवात करतात. या सप्लिमेंट्समध्ये अनेक प्रकारचे घातक पदार्थ मिसळले जातात. अशा परिस्थितीत ते जनावरांना हानी पोहोचवतात, सोबतच अशा प्रकारचे दूध पिणे मानवांसाठीही घातक ठरू शकते.

यामुळेच सरकार मंडळी, गायींना चवळी (Cowpea) चा चारा देण्यावर भर देत आहे, त्यामुळे जनावरांच्या दुधाची उत्पादन पातळी कोणत्याही पूरक सप्लिमेंट्स आहाराशिवाय दररोज 6 ते 7 लिटरपर्यंत वाढल्याचं शेतकऱ्यांना दिसून आलं आहे.

चवळीच्या चाऱ्यात असं काय आहे विशेष ? 

1) इतर खाद्यांपेक्षा जास्त पचायला सोपं.
2) क्रूड प्रोटीन आढळतं.
3) क्रूड फायबरचे घटक देखील आढळतात, जे गायींमध्ये दूध उत्पादनाची पातळी वाढवण्यास मदत करतात.

शेतकरी बांधवांना जर चवळीचं पीक घ्यायचं असेल तर कोणत्याही बियाणे केंद्रातून त्याची बियाणे खरेदी करू शकतात. सध्या चवळीच्या EC- 4216, UPC-287, UPC-5286, GFC-1, GFC-2, GFC-4 या जाती बियाणे केंद्रांवर उपलब्ध आहेत…

ही माहिती आवडली असल्यास आपल्या जवळच्या शेतकरी मित्राला नक्की शेयर करा. अन् शेती विषयक बातम्या, शासकीय योजना फ्री मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp WhatsApp वर, हा क्रमांक तुमच्या ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9579334058

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *