Take a fresh look at your lifestyle.

‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिर्दो चा अपघात ; डोक्याला गंभीर इजा ; 6 तास होऊनही…

शेतीशिवार टीम, 28 डिसेंबर 2021 : ‘बचपन का प्यार’ हे गाणं गाऊन सोशल मीडियावर लोकप्रिय झालेला सहदेव दिर्दो रस्ता अपघाताचा बळी ठरला आहे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून सहदेवला कोसुकमा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सहदेववर आयसीयूत उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी सहदेव हा मित्रासोबत दुचाकीवरून शबरी नगरला जात असताना त्यांची दुचाकी रस्त्यावरील अनियंत्रित झाली. या अपघातात सहदेव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी त्यांच्या डोक्याला चार टाकेही घालण्यात आले असून 6 तास उलटूनही सहदेव अजून शुद्धीवर आला नाहीये.

यादरम्यान, एसपी सुनील शर्मा आणि जिल्हाधिकारी विनीत नंदनवार सहदेवला पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. त्याने सहदेवाची चौकशी केली. सहदेववर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना दिल्या. त्याचबरोबर सहदेवला पुढील उपचारासाठी जगदलपूर मेडिकल कॉलेज ला रेफर करण्यात आलं आहे.

कोण आहे सहदेव :-

छत्तीसगडच्या सुकमाचा रहिवासी असलेला सहदेवने सोशल मीडियावर ‘बचपन का प्यार’ हे गाणं गाऊन धुमाकूळ घातला होता. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यामुळे तो रातोरात स्टार झाला. या व्हिडिओमध्ये सहदेव त्याच्या वर्गात ‘बचपन का प्यार’ गाणं गाताना दिसत होता. त्याचा आवाज क्षीण असला तरी, सहदेवचा व्हिडिओ लोकांना खूप आवडला होता, त्यामुळे सर्वजण त्यावर रील बनवत होते. इतकेच नाही तर अनेक बॉलीवूड स्टार्सनीही सहदेवच्या व्हिडीओवर रील्स बनवले आहेत.

बादशहासोबत केलं आहे काम :- 

सहदेवचा व्हिडिओ बराच काळ सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. गायक-रॅपर बादशाहलाही त्याचा हा व्हिडिओ खूप आवडला, ज्यामुळे त्याला बादशाहसोबत काम करण्याची संधी मिळाली. सहदेवचा व्हिडीओ पाहून बादशहाने त्याला भेटायला बोलावले. यानंतर दोघेही दिल्लीत भेटले. बादशाहने सहदेवसोबत ‘बचपन का प्यार’ या गाण्यावर एक गाणे तयार केले होते, ज्यामध्ये सहदेव दिसला होता.

बादशाहनेही ट्विट करून सहदेवच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले- ‘मी सहदेव यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रांच्या संपर्कात आहे. तो अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहे, त्याला रुग्णालयात नेले जात आहे. मी त्याच्यासाठी उभा आहे. तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.