Take a fresh look at your lifestyle.

BREAKING : विनायक मेंटेनंतर आज सकाळी दुसरा मोठा धक्का ; शेयर मार्केट किंग राकेश झुनझुनवालाचे 62 व्या वर्षी निधन !

शेतीशिवार टीम : 14 ऑगस्ट 2022 :- भारतातील दिग्गज उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. आकासा एअरच्या उद्घाटन समारंभात ते शेवटचे सार्वजनिकरित्या दिसले होते.

आज सकाळी 6.45 वाजता मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलने रुग्णालय प्रशासनानं त्यांचं निधन झालं असल्याची माहिती दिली आहे. झुनझुनवाला यांना 2-3 आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता आणि ते घरी आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी आकासा एअरलाईन्स सुरू केली. झुनझुनवाला यांच्या निधनाची बातमी ऐकून शेयर मार्केटमध्ये सर्वांनाच धक्का बसला आहे.

काही काळापूर्वी राकेश झुनझुनवाला यांनी आकासा नावाने एअरलाइन कंपनी उघडली असून, प्रवाशांना कमी दरात सुविधा देण्यासाठी चर्चेत आहे. या विमान कंपनीला नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळाले आहे.

भारतीय शेअर बाजाराला म्हटले जाते ‘बिग बुल’…

राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. एकदा राकेश झुनझुनवाला यांनी सांगितले की सुरुवातीला त्यांनी $100 ची गुंतवणूक केली होती. विशेष म्हणजे तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 150 अंकांवर होता, जो आता 60 हजारांच्या पातळीवर व्यवहार करत आहे..

राकेश झुनझुनवाला हे भारताचे वॉरेन बफे म्हणूनही ओळखले जातात. शेअर बाजारातून पैसे कमावल्यानंतर बिग बुलने एअरलाइन क्षेत्रातही प्रवेश केला होता. त्यांनी Akasa Air या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती आणि 7 ऑगस्टपासून कंपनीने काम सुरू केले आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांच्याकडे आज हजारो कोटींची संपत्ती आहे. गंमत म्हणजे एवढी संपत्ती असलेल्या व्यक्तीचा प्रवास केवळ 5 हजार रुपयांपासून सुरू झाला.

आता ‘इतकी’ आहे झुनझुनवालाची एकूण संपत्ती…

राकेश झुनझुनवाला, ज्यांना भारताचे वॉरेन बफे म्हटले जाते, त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत शेअर बाजार आहे. झुनझुनवालाची ही यशोगाथा अवघ्या 5 हजार रुपयांपासून सुरू झाली. आज त्यांची एकूण संपत्ती 40 हजार कोटींच्या आसपास आहे. या यशामुळे झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजाराचा बिग बुल आणि भारताचे वॉरेन बफे असे संबोधले जाते. सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसे गमावत असतानाही झुनझुनवाला कमाई करतात.