Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक ! 8 महिन्यांच्या गर्भवतीचा बेडवर मृतदेह, तर पती फॅनला गळफास अवस्थेत ; हत्या की आत्महत्या ?

महाअपडेट टीम,17 डिसेंबर 2021:- बीड तालुक्यातील वैतागवाडी येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आलं आहे. एका बंद खोलीत 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृतदेह बेडवर तर त्याच खोलीत पतीचा मृतदेह फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे

राजेश भालचंद्र जगदाळे (वय 26) व दीपाली राजेश जगदाळे (वय 24) अस मयत दांम्पत्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी 3 च्या सुमारास घडली आहे. शवविच्छेदनानंतर हत्या की आत्महत्या हे स्पष्ट होणार असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे नेकनूर पोलिसांकडून सांगण्यात आले.

सविस्तर माहिती अशी की, नेकनूरपासून, पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वैतागवाडी हे जोडपं राहत असून त्यांचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच गुरुवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास नेकनूर पोलीस स्टेशनला वैतागवाडी येथे सदरील घटना घडल्याचा फोन आला .

त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव व त्यांचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले असता त्यांना राजेश जगदाळे हा फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला तर दिपाली या बेडवर मृतावस्थेत पडलेल्या होत्या.

या घटनेचा पंचनामा नेकनूर पोलिसांनी केला असून, दोन्ही मृतदेह येथील स्त्री व कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालानंतर हत्या की आत्महत्या हे समजू शकणार असून, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती नेकनूर पोलिसांनी दिली.

विवाहिता 8 महिन्याची गर्भवती :-

विवाहिता ही 8 महिन्याची गर्भवती असून एक वर्षापूर्वी या मृत दांम्पत्याचा विवाह झाला होता. त्यानंतर दिपाली व राजेश यांचा सुखी संसार सुरु झाला होता . त्यांच्यात कधी वाद देखील झाले नसल्याचे परिसरातील नागरिकांमधून सांगितले जात आहे. पती – पत्नीचे मृतदेह आढळून आल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.