Business Idea : ‘या’ औषधी वनस्पतीला बाजारात मोठी डिमांड ; फक्त एकदाच लावा ही रोपे अन् व्हा लखपती ; जाणून घ्या, सर्वकाही…

0

शेतीशिवार टीम : 28 जुलै 2022 :- आजकाल अनेक लोक पारंपरिक शेती सोडून नगदी पिकाकडे वळले आहेत. अशा पिकांमध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न अनेक पटींनी वाढते. तुम्ही नगदी पीक घेण्याचाही विचार करू शकता. आज आपण औषधी गुणधर्म असलेल्या एका वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत. 

ज्याची मुळे, कांड, पाने, बिया, सर्वकाही बाजारात विकलं जातं. आम्ही बोलत आहोत गुलखैरा शेतीबद्दल (Gulkhaira Farming). या पिकातून शेतकरी समृद्ध होत असून लाखो रुपयांची कमाई करत आहे.

गुलखेरा वनस्पतीची खास गोष्ट म्हणजे कोणत्याही पिकाच्या दरम्यान लागवड करून तुम्ही नफा मिळवू शकता. गुलखेरा हे औषधांमध्ये सर्वाधिक वापरलं जातं. त्यामुळे गुलखेरा फुलाची लागवड करून शेतकरी सहजपणे बंपर कमवू शकतात…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुलखेरा 10,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकतो. एका एकरमध्ये 15 क्विंटल क्विंटल गुलखेरा निघतो.  त्याची सुमारे 1.50 लाख रुपयांना विक्री होते.

गुलखेरा पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा पेरणी केल्यानंतर दुसऱ्यांदा बाजारातून बियाणे विकत घ्यावे लागत नाही. या पिकांच्या बिया पुन्हा पेरल्या जाऊ शकतात. गुलखेराची पेरणी जुलै – ऑगस्ट महिन्यात केली जाते. डिसेंबर – जानेवारी महिन्यात पीक तयार होतं. पीक तयार झाल्यानंतर झाडांची पाने व देठ सुकून शेतातच पडतात. जे नंतर गोळा केले जाते.

कुठे होतो गुलखेराचा वापर…

गुलखेराची फुले, पाने, देठ हे सर्व खूप उपयुक्त आहेत. युनानी औषधे बनवण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. यापासून बनवलेली औषधे खोकला, ताप तसेच इतर सर्व आजारांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात.

कोणत्याही रोगावर उपलब्ध असलेली रासायनिक औषधे त्वरीत कार्य करतात, परंतु ते इतर अनेक रोगांना कारणीभूत ठरतात. दुसरीकडे गुलखेराच्या फुलांपासून बनवलेले औषध खूप गुणकारी आहे. कमी खर्चातही त्याची लागवड करता येते. (Benefits of Medicinal plant Gulkhaira)

सर्वाधिक शेती कुठे केली जाते ?

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसारख्या देशांमध्ये या वनस्पतीची लागवड सर्वाधिक केली जाते. हळूहळू भारतातही लोक या वनस्पतीची लागवड करत आहेत. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी त्याची लागवड करत आहेत. कन्नौज, हरदोई, उन्नाव या जिल्ह्यांतील शेतकरी त्याची लागवड करून दरवर्षी मोठी कमाई करत आहेत.

बिया खरेदी करण्यासाठी :-  इथे क्लिक करा 

Leave A Reply

Your email address will not be published.