या गावात 150 एकरावर सफेद कांद्याची लागवड ! प्रतिमाळ मिळतोय 100 रुपयांचा दर, कुठे आहे सर्वाधिक मागणी ? पहा खासियत..

0

तालुक्यातील म्हसरोळी या गावात सात ते आठ वर्षांपासून खरीपातील भातपीक कापणीनंतर डिसेंबरमधे सफेद कांदा लागवड केली जात आहे. मात्र या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किमत मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत गावातील शेतकऱ्यांकडून सफेद कांद्याचा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाऊ लागली आहे.

विक्रमगड तालुक्यापासून जवळ असलेल्या मुंबई, पालघर, नालासोपारा, वसई – विरार, भाइंदर अशा शहरातून या कांद्याला पंथी मागणी असते. त्यामुळे म्हसरोली गवाताल शतकरी अधिक प्रमाणात सफेद कांद्याची लागवड करू लागले आहेत.

म्हसरोली गावातील अंदाजे 110 शेतकऱ्यांनी यावर्षी 100 ते 150 एकरवर सफेद कांद्याची लागवड केली आहे. यातून यावर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन या एका गावातून येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

विक्रमगड तालुक्यात शेतीत विविध नवनवीन प्रयोग केले जात आहेत. त्यामुळे शेतीक्षेत्रात पालघर जिल्ह्यात विक्रमगड तालुका केंद्रबिंदू ठरू लागला आहे. फुलशेतीमध्ये मोगरा, सोनचाफा, गुलाब, झेंडू, सूर्यफूल, तुती लागवड, हळद लागवड, भाजीपाला लागवड असे विविध प्रयोग शेतीक्षेत्रात शेतकरी करत आहेत.

यापुढेही एक पाऊल पुढे टाकत जे इतर शेतकरी प्रयोग करता आहेत तेच पीक न घेता जे पीक मार्केटला अधिक उत्पादन देईल याकडे शेतकऱ्याचा अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. शेतीतील विविध पिकांमुळे शेतीक्षेत्रात विक्रमगड तालुक्याचे नाव नावारूपाला येत आहे.

सफेद कांद्याचे औषधी गुणधर्म..

सर्दी किंवा कफची समस्या असेल तर ताजा कांद्याचा रस गूळ व मध टाकून प्यायल्यास ही समस्या दूर होते.

रोज कांदा खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होते है मधुमेह रोगावर परिणाम करते.

कच्च्या कांद्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. यात मिथाईल सल्फाईड आणि अमिनो ॲसिड असते. हे कोलेस्टेरॉलही नियंत्रणात ठेवते तसेच हृदयाच्या तक्रारींपासूनही दूर ठेवते .

रोज कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरताही दूर होते. यामुळे ॲनिमियाही दूर होतो.

पारंपरिक पद्धतीला शेतकऱ्यांचा फाटा..

पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन यावर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे. यात सेंद्रिय खत, दर्जेदार बियाणे, पाण्याचे योग्य नियोजन केले आहे यामुळे एकरी 10 ते 15 टन एवढे विक्रमी उत्पादन घेण्यास मदत होऊ शकणार आहे. चांगल्या प्रतिचा कांदा उत्पादित झाल्यास त्याला प्रतिमाळ 90 ते 100 रुपये चांगला दर मिळू शकेल, असा विश्वास कांदा लागवड शेतकऱ्याने व्यक्त केला आहे.

म्हसरोली भागात गेल्या पाच सहा वर्षांत सफेद कादा हा अल्प प्रमाणात उत्पादित होत असे मात्र गेल्या तीन – चार वर्षांत आमच्या गावात सर्वच शेतकरी सफेद कांदा लागवड करत आहेत. सफेद कांद्याला मिळणाऱ्या जादा भावामुळे सफेद कांदा लावण्यासाठी गावातील सर्वच शेतकरी पुढे आले आहेत. हे चार महिन्याचे पीक असून, चार महिन्यात एका शेतकऱ्याला ते दोन लाख उत्पन्न मिळते.
अजित पाटील, सफेद कांदा उत्पादक

Leave A Reply

Your email address will not be published.