केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एप्रिल महिन्याच्या पगारात त्यांना वाढीव महागाई भत्त्याचे गिफ्ट मिळणार आहे. एप्रिल महिन्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासह वाढीव पगार सरकार अदा करणार आहे. 1 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. जानेवारी 2023 पासून महागाई भत्ता दिला जाणार आहे. महागाई भत्त्यात (DA Hike) 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

DA मध्ये 42% पर्यंत वाढ..

कामगार मंत्रालयाच्या मते, डिसेंबर 2022 मध्ये, औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AI CPI-IW) 132.3 वर पोहोचला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा डीए 4 टक्क्यांनी वाढला आहे. 24 मार्च रोजी मंत्रिमंडळाने महागाई भत्ता 38 टक्क्यांवरून 42% केला. आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या एप्रिलच्या पगारासह पगार दिला जाणार आहे. त्याचबरोबर त्यांना 3 महिन्यांची थकबाकीही मिळणार आहे.

1 लाख 20 हजार रुपये कसे मिळणार ?

समजा एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार दरमहा 30,000 रुपये असेल, तर त्यामुळे त्याच्या पगारात महिन्याला 1200 रुपयांची वाढ होणार असून वार्षिक आधारावर, एकूण पगार थेट 14,400 रुपयांनी वाढणार आहे.

कॅबिनेट सचिवांच्या अधिकाऱ्यांच्या पगारात दरमहा 10 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कॅबिनेट सचिवांचे मूळ वेतन दरमहा अडीच लाख रुपये आहे. अशा प्रकारे त्यांच्या पगारात वर्षाला 1 लाख 20 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

महागाई भत्ता म्हणजे नेमकं काय ?

महागाई भत्ता हा असा पैसा आहे, जो सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या राहणीमानाचा खर्च सुधारण्यासाठी दिला जातो. महागाई वाढल्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या राहणीमानात कोणताही फरक पडू नये म्हणून हा पैसा दिला जातो. हा पैसा सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिला जातो.

दर 6 महिन्यांनी होतो बदल..

कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. हा भत्ता सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिला जातो. महागाई भत्ता वाढल्यानंतरही कर्मचाऱ्यांना जगण्यात अडचण येऊ नये म्हणून महागाई भत्ता दिला जातो. सामान्यतः, जानेवारी आणि जुलैमध्ये दर 6 महिन्यांनी महागाई भत्ता सुधारला जातो.

वेग-वेगळा असतोय DA

कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या आधारे महागाई भत्ता दिला जातो. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वेगळा असतो. महागाई भत्ता मूळ पगारावर मोजला जातो. महागाई भत्त्याच्या गणनेसाठी एक सूत्र निश्चित केले आहे, जे ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) द्वारे निर्धारित केले जाते.

हे सूत्र वापरलं जातं..

महागाई भत्ता टक्केवारी = गेल्या 12 महिन्यांतील CPI ची सरासरी-115.76. आता जे येईल त्याला 115.76 ने भागले जाते. येणार्‍या संख्येचा 100 ने गुणाकार केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *