Take a fresh look at your lifestyle.

पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला ‘ग्रोथ इंजिन’ ! आता ‘हा’ रेल्वेमार्ग होणार विकसित, 107Km अंतरासाठी 3,411 कोटींचा खर्च, या गावांतून जाणार रूट..

0

कोल्हापूर – वैभववाडी या 3 हजार 411 कोटी 17 लाख रुपये खर्चाच्या पीएम गतिशक्तीअंतर्गत प्रस्तावित रेल्वेमार्गाची शिफारस 53 व्या राष्ट्रीय नियोजन गटाच्या (NPG) बैठकीत करण्यात आली. यामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ धावणार आहे.

दीर्घकालीन या मागणीला केंद्राकडून हिरवा कंदील मिळाल्याने सर्वच घटकांकडून समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. घाटमाथ्याचा परिसर कोकणला रेल्वेमार्गाने जोडावा, यासाठी बऱ्याच वर्षापासून मागणी केली जात होती.

कारण रेल्वेची प्रवासी वाहतुकीसह मालवाहतूक तुलनेने स्वस्त आणि आरामदायी असते. दुसऱ्या बाजूला घाटमाथ्यावरून कोकणला जोडणारे रस्ते अनेक वेळा अपघात, दरडी कोसळणे, महापूर आदी कारणांमुळे बंद असतात. त्यामुळे संबंधित वाहतूक ठप्प होते. याचा थेट परिणाम अर्थकारणावर होतो. त्यामुळे रेल्वे वाहतूक हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे वेळोवेळी अभ्यासकांकडून स्पष्ट केले जात होते.

त्यामुळे कोल्हापूर – वैभववाडी या रेल्वेमार्गाला विशेष महत्त्व आहे. उद्योग आणि व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत लॉजिस्टिक्स सचिव सुमिता दावरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या रेल्वेमार्गाबाबत शिफारस करण्यात आली. या बैठकीत तीन रेल्वे प्रकल्प आणि तीन रस्ते प्रकल्प अशा एकूण 28,875.16 कोटी रुपयांच्या सहा प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात आले. हे प्रकल्प सामाजिक व आर्थिक विकासासाठी मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी पुरवतील. शहरी आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधांवरील ताणही कमी करतील.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला फायदा..

या गटाने महाराष्ट्रातील वैभववाडी – कोल्हापूर या 3411.17 कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावित रेल्वेमार्गाची शिफारस केली. या रेल्वेमार्गामुळे इतर उद्योगांव्यतिरिक्त या भागातील विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी औष्णिक कोळशाच्या वाहतुकीला मदत मिळणार आहे. या भागातील पर्यटन आकर्षणाव्यतिरिक्त उद्योगांचे नव्या पायाभूत सुविधांच्या कनेक्टिव्हिटीसंदर्भात करण्यात केले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादित शेतीमाल बंदरापर्यंत पोहोचण्यास, तर कोकणातील खनिजासह अन्य मालाची पश्चिम महाराष्ट्रात वाहतूक करणे सुलभ आणि किफायतशीर होऊन कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल.

सध्या पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते, तर कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे, तर कोकणातील मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.

असा असणार रेल्वेमार्ग..

3411.17 कोटींच्या खर्चास शिफारस..

नियोजित मार्ग 107 किलोमीटरचा

या रेल्वेमार्गावर 10 स्थानके, 5 उड्डाणपूल, 26 बोगदे..

वैभववाडी – सोनाळी – कुंभारवाडी – कुसुर – उंबर्डे – मांगवली – उपळे-ऐनारी (ता. वैभववाडी) सैतवडे – कळे – भुये – कसबा बावडा – मार्केट यार्ड कोल्हापूर असा मार्ग असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.