इलेक्ट्रिक मोटर, PVC, HDPE पाइपसाठी 30 हजारांपर्यंत अनुदान ! कृषी विभागाकडून अर्ज करण्याचे आवाहन, पहा अर्ज प्रोसेस..
आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना कधीकधी शेतीमध्ये सिंचनासाठी पाइपलाइन आणि इलेक्ट्रिक मोटर्स खरेदी करणे कठीण जाते. अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य, भरडधान्य, पौष्टीक तृणधान्य व कापुस विकास कार्यक्रम, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन 2024 या वर्षासाठी अर्ज करावे असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाइपलाइनद्वारे सहज सिंचन करता येईल.
या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना पाइपलाइन खरेदीवर 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे राज्यातील शेतकऱ्यांची सिंचनाच्या समस्येतून सुटका होणार आहे. यामुळे त्याला आपल्या पिकांपासून चांगले उत्पादन घेता येणार आहे.
शेतकऱ्यांना पीव्हीसी पाइपलाइन आणि इलेक्ट्रिक मोटर खरेदी करण्यासाठी सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. हे अनुदान एकूण 25000 रुपये असेल. यामध्ये पीव्हीसी पाईपसाठी 15 हजार रुपये आणि 10 HP पर्यंत किमान 4 स्टार रेट असलेल्या इलेक्ट्रिक मोटरसाठी 10 हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत. शेतीशिवारच्या या पोस्टमध्ये जाणून घेऊया की हे अनुदान कसे मिळवायचे ? पात्र शेतकरी कोण असतील? ही पोस्ट पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल..
किती मिळणार अनुदान..
वैयक्तिक शेतकरी वापरासाठी पाण्याच्या स्त्रोता पासून शेतापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी पाईप खरेदीवर एचडीपीई पाईप्स (HDPE PIPES) 50 मीटर व पीव्हीसी पाईप्स (PVC PIPES) 35 मीटर खरेदीवर जास्तीत जास्त रु. 15 हजार किवा 50 टक्के या पैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील.
इलेक्ट्रिक मोटरसाठी 10 हजार रुपये अनुदान :- अर्ज प्रोसेस पहा
यासाठी महाडीबीटी प्रणालीवर या बाबीच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी अर्ज करणे आवश्यक आहे..
सिंचन पाईप अनुदान योजनेसाठी कसा कराल अर्ज ?
या योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला https://mahadbt.maharashtra.gov.in/ वर अर्ज करावा लागेल.
यानंतर तुम्हाला तुमचा आयडी तयार करावा लागेल, हा आयडी तयार करण्यासाठी तुम्हाला होम पेजवर नवीन अर्जदार नोंदणीवर क्लिक करावे लागेल.
यानंतर, एक फॉर्म उघडेल, ज्यामध्ये अर्जदाराशी संबंधित माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट करा वर क्लिक करा.
नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ‘अर्ज करा’ यावर क्लिक करा.
आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती टाकावी लागेल आणि Submit वर क्लिक करावे लागेल.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, तुम्हाला या फॉर्मची प्रिंट काढावी लागेल आणि ती तुमच्याकडे सुरक्षित ठेवावी लागेल. यासोबतच त्याची प्रत जवळच्या कृषी विभाग कार्यालयात किंवा तुमच्या ग्रामपंचायतीच्या कृषी ग्रामसेवकाकडे जमा करणे आवश्यक आहे.
विभागातील कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाईल, त्यानुसार अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यावर पाठवली जाईल..