Take a fresh look at your lifestyle.

Fal Pik Vima Yojana 2022 : द्राक्षे, केळी, डाळिंबसहित या 9 फळपिकांसाठी अर्ज सुरु, हेक्टरी मिळवा 3,20000 रु.विमा लाभ, पहा अर्ज प्रोसेस

0

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन 2022-23 आंबिया बहारमध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी (प्रायोगिक तत्त्वावर) या 9 फळपिकांना लागू करण्यात आली असून, या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी केले आहे. (Prime Minister Crop Insurance Scheme)

नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण देणारी ही योजना असून, 30 जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार, तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातीत अधिसूचित पिकासाठी ऐच्छिक आहे.

कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास तसे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरून बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बँकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत. असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने / भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्र मयदिपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे.

केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे . त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.

या योजनेत सहभागाची द्राक्ष फळपिकासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबर असून, विमा संरक्षित रक्कम 3 लाख 20 हजार रुपये तर गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम 1 लाख 6 हजार 667 रुपये आहे.

मोसंबी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम 80 हजार रुपये तर गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम 26 हजार 667 रुपये

केळी फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम 1 लाख 40 हजार रुपये तर गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम 46 हजार 667 रुपये

पपई फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम 35 हजार रुपये तर गारपीट या हवामान धोक्याकरिता विमा संरक्षित रक्कम 11 हजार 667 रुपये असून, या तिन्ही पिकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2022 असून पुणे – अहमदनगर जिल्ह्यासह 30 जिल्ह्यांना अर्ज करण्याचे आवाहन राज्य कृषी विभागाने केलं आहे.

पहा, आवश्यक कागदपत्रे :-

1) आधार कार्ड
2) शिधापत्रिका
3) बँक खाते
4) आधार कार्ड
5) तुम्ही जमीन भाड्याने घेतली असल्यास शेतमालकाशी केलेल्या कराराची छायाप्रत
6) शेती खाते क्रमांक
7) शेतकऱ्याचा फोटो
8) शेतकऱ्याने फळे रोपण सुरू केल्याची तारीख

ऑनलाईन अर्ज कसा कराल ?

जर तुम्ही वर दिलेले पात्रता निकष पूर्ण केले, तर तुम्ही खाली दिलेल्या सोप्या टिप्सद्वारे फळपीक विमा योजना : 2022 अंतर्गत अर्ज करू शकता…

सर्वप्रथम तुम्हाला पीएम फसल विमा योजनेच्या https://pmfby.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल

फळपीक विमा योजना योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्ही प्रथम तुमचे स्वतःचे अकाउंट तयार केलं पाहिजे.

अकाउंट तयार करण्यासाठी, रजिस्ट्रेशन https://pmfby.gov.in/selfRegistration वर क्लिक करा आणि विचारलेले सर्व डिटेल्स योग्यरित्या भरा.

सर्व डिटेल्स प्रविष्ट केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा, याद्वारे तुमचे खाते अधिकृत वेबसाइटवर तयार केलं जाईल.

अकाउंट तयार केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये Login करून पीक विमा योजनेसाठी फॉर्म भरावा लागेल.

पीक विमा योजनेचा फॉर्म योग्यरित्या भरल्यानंतर, तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर Successful असा मॅसेज प्राप्त होईल…

टीप : हा अर्ज तुम्ही जवळच्या SCS / आपले सेवा केंद्रावरही करू शकता. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा अर्ज लवकरात लवकर करायला हवा.

Leave A Reply

Your email address will not be published.