शेवटचा पर्याय म्हणून शेतीकडे पहिले जात होते. आयुष्यात काही करता नाही आले कि तरुण शेतीकडे वळत. पण आता शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. शेती व्यवसायाकडे येणाऱ्या तरुणांचा ओढा आता वाढतो आहे. अनेक सुशिक्षीत तरुण नोकरी सोडून शेती करत आहेत.
पंढरपूर तालुक्यात कासेगांव परागणा मोठा आहे. या परागण्यात द्राक्ष, डाळींब हि नगदी फळपिकांची औद्योगिक शेती होऊ शकते असा ठाम विश्वास घेऊन नानांनी सरळ तासगाव सोडल आणि थेट कासेगाव गाठल. शेतीत प्रयोगांची अशी खुणगाठ बांधून तासगांव तालुक्यातून अनेक शेतकरी ३०-३२ वर्षाखाली दाखल या परिसरात दाखल झाले.
तीन दशकापूर्वी बाळासाहेब झांबरे पाटील यांनी १९८६ साली कासेगावात उधारीवर व पीक उत्पन्नाच्या परतफेडीच्या हमीवर ४ एकर शेती घेतली.
द्राक्ष बागायत करुन नानांनी ४ एकराची १३ एकर शेती केली. पण २००६ साली १३ एकर द्राक्षबागेत काहीही फायदा झाला नाही. तरी ते न खचता, न डगमगता, नव्या उमेदीने पुन्हा द्राक्ष बागायतीसाठी झपाटले, आणि पुन्हा कधी मागे वळून पाहिले नाही.
२००६ पासून नानांनी १३ एकर द्राक्ष बागायतीतून ४०० एकर माळरान घेऊन त्यांवर नानांनी शेतकरी वर्गाला प्रेरणादायी ठरेल अशी ४०० एकर भांडवली द्राक्ष बाग फुलवून, ३०० ते ८०० रोजगार निर्माण करुन आदर्श निर्माण केला आहे. त्यासोबत दररोज शेतात ३०० ते ८०० शेतमजुरांना काम देणारा हा शेतकरी राजाचं म्हंटल तरी वावग ठरणार नाही.
शेतीत घाम गाळून परिस्थितीवर मात करून आदर्श निर्माण करणाऱ्या, उमेद जागविणाऱ्या, शेतकऱ्याच्या कष्टाला कोणीही सलाम करेल. सफेद कपड्यांना डाग न लावता भ्रष्ट खादीसमोर झुकण्यापेक्षा , चिखलात पाय ठेवून आपल्या काळ्या माऊलीसमोर झुकलात तर कोणाला भीक मागण्याची गरज नाही, हा आदर्श नानांनी निर्माण केला आहे.
नाना, आजही वयाच्या ६५व्या वर्षी अहोरात्र कष्ट करुन आधुनिक शेती करतात. नानांच्या शेतीत ४ कोटी लिटरपासून २४ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेची ४ शेततळी आहेत. नानांचा आधुनिक शेतीचा द्राक्षपसारा २ साखरकारखान्यापेक्षा निश्चितच सरस आहे, यांत शंका नाही.
शेतीत फायदा नाही म्हणणाऱ्या शेतकरीबांधवांना प्रेरणा देणारा, पदवीधर असुनही शेती करणारा, तासगांवहून येऊन पंढरपूर मध्ये शेती घेऊन द्राक्षबागायत करणारा, अहोरात्र औद्योगिक स्तरावर कष्ट करणारा शेती मात्र कोणत्याही शासकीय पुरस्कारापासून वंचितचं राहिला आहे. असो सरकारला जग येईल अशी अपेक्षा आपण करूयात.
- जालना – नांदेड समृद्धी एक्सप्रेस-वे : दिवाळीनंतर होणार प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात, ‘या’ 87 गावांतून जाणार मार्ग, पहा संपूर्ण रोडमॅप..
- Small Business Loan : लघु कर्ज मिळवणं होणार सोपं ?
- महिलांना न्यू स्टार्टअपसाठी मिळतंय 25 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य, 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..
- Land Record: दिवसभरात 2 लाख कागदपत्रे डाऊनलोड, फक्त 2 मिनिटांत डाउनलोड करा 7/12 – 8-A, Property Card, eFerfar उतारे..
- फक्त 50 हजारांत सुरु करा ‘मशरूम शेती’ ; 3 चं महिन्यात व्हाल लखपती, सरकारही देतंय 40% अनुदान !