शेतकऱ्यांसाठी शासनाची विशेष योजना : ड्रोन खरेदीवर मिळवा तब्बल 10 लाख रु. अनुदान । अर्ज झाले सुरु, पहा,कागदपत्रे अन् अर्ज प्रोसेस…

0

भारत हा कृषिप्रधान देश असल्याने शेतीमध्ये आधुनिक कृषी यंत्रांचे महत्त्व वाढत आहे. अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार शेतीमध्ये आधुनिक कृषी यंत्रांचा वापर करण्यास प्रोत्साहन देत आहे. कृषी यंत्रांच्या रेंजमध्ये आर्थिक बजेट 2021 मध्ये ड्रोनचाही समावेश करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांना इतर कृषी यंत्रांप्रमाणे ड्रोन खरेदी केले तरी सरकारकडून अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. 

ड्रोन खरेदीसाठी हे अनुदान वैयक्तिक शेतकऱ्यांसहित, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी संघटना, कृषी विद्यापीठाला मिळणार आहे. हे अनुदान कसं मिळणार ? त्यासाठी काय आहे, पात्रता, कागदपत्रे, PDF फॉर्म, अनुदान, अर्ज कुठे करायचा ? याबाबत सविस्तर माहिती तसेच सध्या सगळ्यात जास्त मागणी असलेल्या टॉप 3 कृषी ड्रोनबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

ड्रोनचा शेतीत नेमका काय आहे उपयोग :-

ड्रोनच्या सहाय्याने शेतकरी कमी वेळेत त्यांच्या शेतातील पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करू शकतात.
एवढेच नाही तर फवारणी पद्धतीने बियाणे पेरत असाल तर ड्रोनच्या साहाय्याने बियाणे शेतात शिंपडून पेरता येते.
याशिवाय शेतकरी ड्रोनच्या साह्याने शेतावर लक्ष ठेवू शकतात.

ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांना मिळतील हे फायदे :-

शेतात सर्व पिकांना समान फवारणी मिळेल.

ड्रोनच्या साहाय्याने फवारणी केल्यास शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे. पिकांवर काही वेळातच कीटकनाशकांची फवारणी होईल. दुसरे म्हणजे ड्रोनच्या माध्यमातून शेतात सर्वत्र समान फवारणी केली जाते. याउलट पारंपरिक पद्धतीने फवारणी केली, तर सर्वत्र एकसारखी फवारणी होणे शक्य नाही…

शेतकऱ्यांचे विषबाधेपासून होईल रक्षण :-

शेतकरी पिकाचे किडपासून रक्षण करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करतात. त्यातले बहुतेक कीटकनाशक हे विषारी ते अतिविषारी असतात यामुळे पंपाद्वारे फवारणी केली तर विषबाधा होण्याची शकता बळावते. या विषबाधेमुळे अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा सर्वात महत्वाचा फायदा शेतकऱ्यांना होतो.

शेतीचा खर्च कमी होईल अन् पैसेही वाचतील :-

दुसरीकडे पारंपरिक पद्धतीने फवारणी केली, तर 2-3 मजूर लागतात. एका मजुराची मजुरी 500 रुपये मानली तर तीन मजुरांची मजुरी 1500 रुपये होते. तर ड्रोनच्या फवारणीवर एक एकराचे भाडे अवघे 400 रुपये येतं.

ड्रोनवर अनुदान किती मिळतं ?

कृषी ड्रोनच्या खरेदीवर,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक महिलांना ड्रोनच्या किमतीच्या 50% किंवा कमाल 5 लाख रुपये अनुदान दिलं जातं.

इतर शेतकऱ्यांना 40% किंवा कमाल 4 लाख रुपयांची मदत दिली जाते.

तसेच कृषी यंत्रसामग्री प्रशिक्षण आणि चाचणी संस्था, ICAR संस्था, कृषी विज्ञान केंद्रे आणि राज्य कृषी विद्यापीठांना ड्रोन खरेदीवर 100% अनुदान दिलं जातं. याबाबत तुम्हाला जर भाडेतत्वावर फवारणी साठी ड्रोन मिळवायचे असतील तर तुम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) येथे संपर्क साधू शकता..

आवश्यक कागदपत्रे :-

आधार कार्ड
ड्रोनचे अधिकृत विक्रेत्याचे दरपत्रक / कोटेशन.
बँक पासबुकाचे झेरॉक्स
कॅन्सल चेक
वैक्तिक लाभासाठी जात प्रमाणपत्र
संस्था असेल तर नोंदणी प्रमाणपत्र.
रिमोट पायलट परवाना

वैयक्तिक लाभासाठी अर्ज कुठे व कसा कराल ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागणार आहे.

तुम्हाला तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाला भेट द्यावी लागेल. तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून हा अर्ज सादर करायचा आहे याच्या सोबत कागदपत्रे ही तुम्हाला सादर करावे लागतील.

ड्रोन खरेदी साठी तुम्ही कागदपत्रांची पूर्तता केली असेल तर आपल्याला ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळेल. यासाठी तुम्ही लवकरात लवकर तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट घ्या….

🛑ड्रोन अनुदान योजना फॉर्म PDF मध्ये – येथे पहा

ड्रोन कपॅसिटी आणि किंमत :-

1) AAT 10L Skykeeper X4 Agricultural Drone, Capacity: 16L :-

https://www.indiamart.com/proddetail/10l-skykeeper-x4-agricultural-drone-22651237688.html?pos=1&pla=n

2) Mode 2 Carbon Fiber Agricultural drone, Model Name/Number: Kci Hexacopter, Capacity: 10 Ltr :-

https://www.indiamart.com/proddetail/agricultural-drone-24874848230.html

Leave A Reply

Your email address will not be published.