देशात दूध उत्पादन वाढवण्यासाठी सरकार पशुसंवर्धन आणि दुग्ध उद्योगाला चालना देत आहे. यासाठी शासनाने दुग्धव्यवसाय उघडू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव डेअरी उद्योजक विकास योजना आहे (Dairy Entrepreneur Development Plan). या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय उघडण्यासाठी शासनाकडून अनुदानाचा लाभ दिला जातो.
जर तुमच्याकडे डेअरी उघडण्यासाठी पैसे नसतील तर तुम्हाला या योजनेअंतर्गत बँकेकडून 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल. तुम्हालाही डेअरी उघडण्यात रस असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपचं उपयुक्त आहे. आज, शेतीशिवार च्या या पोस्टमध्ये, आपण डेअरी उघडण्यासाठी बँकेकडून कर्ज कसे घेऊ शकता ? आणि सरकारच्या अनुदानाचा लाभ कसा घेऊ शकता? ते जाणून घेणार आहोत. याशिवाय, आपण या पोस्टमध्ये अर्ज करण्याची पद्धत आणि कागदपत्रांबद्दल माहिती देखील जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सरकारच्या डेअरी उद्योजक विकास योजनेबद्दल…
काय आहे, शासनाची डेअरी उद्योजक विकास योजना (Dairy Entrepreneur Development Plan) :-
पशुसंवर्धन आणि दुग्धउद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने सरकारद्वारे दुग्ध उद्योजक विकास योजना चालवली जात आहे. या योजनेंतर्गत 10 म्हशींचे दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी पशुधन विभागाकडून 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिलं जाते. याशिवाय शासनाकडून यावर सबसिडीही दिली जाते. भारत सरकारने 1 सप्टेंबर 2010 रोजी ही योजना सुरू असून या योजनेत केंद्र सरकारने महत्वपूर्ण बदल केले आहे.
या योजनेत दुग्धव्यवसाय उघडण्यासाठी बँकेकडून कर्ज कसे मिळवाल ?
जिल्हा दुग्धउद्योजक विकास योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी, तुम्हाला व्यावसायिक बँका, प्रादेशिक बँका, राज्य सहकारी बँका, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँका आणि नाबार्डकडून पुनर्वित्त मिळण्यास पात्र असलेल्या इतर संस्थांशी संपर्क साधावा लागणार आहे. जर कर्जाची रक्कम एक लाखापेक्षा जास्त असेल तर कर्जदाराला जमिनीशी संबंधित 7/12 कागदपत्रे गहाण ठेवावी लागणार आहे.
बँकेच्या कर्जावर किती मिळणार सबसिडी :-
सर्वसाधारण प्रवर्गातील दुग्धशाळा चालकांना दुग्धव्यवसाय उघडण्यासाठी बँकेकडून घेतलेल्या कर्जावर 25% अनुदान दिलं जाईल. तर महिला आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 33% अनुदान दिलं जातं. यामध्ये तुम्हाला फक्त 10% पैसे गुंतवावे लागतील. उर्वरित 90% पैशांची व्यवस्था बँक कर्ज आणि सरकारच्या अनुदानातून केली जाणार आहे.
कशी दिली जाणार सबसिडी :-
आता दुग्धव्यवसाय उघडण्यासाठी तुम्हाला अनुदानाचा लाभ कसा मिळेल याबद्दल जाणून घेउया. योजनेंतर्गत दिले जाणारे अनुदान हे बॅक-एंडेड सबसिडी असेल. या अंतर्गत नाबार्डकडून दिले जाणारे अनुदान तुम्ही ज्या बँक खात्यातून कर्ज घेतले आहे त्याच बँक खात्यात दिलं जाईल. यानंतर ती बँक ती रक्कम कर्ज देणाऱ्या व्यक्तीच्या नावावर जमा करेल. या पैशातून बँकेच्या कर्जाचे व्याज माफ केले जाईल…
10 म्हशींच्या डेअरीवर किती मिळू शकतं बँक कर्ज :-
10 म्हशींची डेअरी उघडायची असेल तर 10 लाख रुपये लागतील. यापैकी तुम्हाला बँकेकडून कमाल 7 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकतं. यावर, तुम्हाला कृषी मंत्रालयाच्या DEDS योजनेत सुमारे 2.5 लाख रुपयांची सबसिडी मिळेल. हे अनुदान नाबार्डकडून दिलं जातं.
बँक कर्जासाठी अर्ज कसा करावा ?
बँकेच्या कर्जासाठी अर्ज करताना, सर्वप्रथम तुम्हाला एक डेअरी प्रकल्प (Dairy Project) बनवावा लागेल आणि तुम्हाला किती जनावरे डेअरी उघडायची आहेत. त्या आधारे तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळेल. यासोबतच कर्ज घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे द्यावी लागतील जी खालीलप्रमाणे आहेत :-
अर्जदाराचे आधार कार्ड
अर्जदाराचे पॅन कार्ड
अर्जदाराचे जात प्रमाणपत्र
अर्जदाराच्या बँक खात्याचा कॅन्सल चेक
बँकेचे ना-हरकत प्रमाणपत्र
याशिवाय Dairy Project रिपोर्टचे झेरॉक्स
योजनेबद्दल अधिक माहितीसाठी कोठे संपर्क साधावा ?
योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही तालुका विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता. याशिवाय तुमच्या नजीकच्या डेअरी पशू विकास केंद्र आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधून दूध उत्पादन, पशुधन आणि अनुदान या विषयावर माहिती मिळवू शकता…
अधिक माहितीसाठी तुम्ही startupindia.gov.in या व्हेबसाईटला भेट द्या.
अर्ज भरण्यासाठी PDF फॉर्म डाउनलोड करण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करा
One Response