शेतीशिवार टीम, 3 डिसेंबर 2021 : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात खातंही उघडता आलं नाही आणि LBW आऊट झाला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि केवळ 4 चेंडू खेळून तो शून्यावर बाद झाला. यामुळे भारताची धावसंख्या 3 विकेटवर 80 धावा झाली.
मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 80 धावा जोडल्या. त्यानंतर एजाज पटेलने अप्रतिम खेळ दाखवत या धावसंख्येवर भारतासाठी ३ बळी घेतले. 28व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने शुभमन गिलला रॉस टेलरकडे झेलबाद केले. गिलने 71 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 44 धावा केल्या. त्यानंतर त्याच्या पुढच्याच षटकात चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली शून्यावर बॅड झाले.
Wasn't that bat first? 😮#ViratKohli pic.twitter.com/j21tYGMMoB
— Moti Sure Laddu (@NeelsNishchay) December 3, 2021
विराटला आउट दिल्याने निर्माण झाला वाद :-
विराटने मैदानावरील पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले आणि DRS चा अवलंब केला. चेंडू त्याच्या बॅटला आणि पॅडला एकाच वेळी लागल्याचं पंचांला रिव्ह्यूमध्ये आढळून आलं. परंतु चेंडू आधी बॅटला लागल्याचं स्पष्ट दिसून येत होतं.यामुळे टीव्ही अंपायरनेही निर्णय कायम ठेवला आणि विराटला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं…