मुंबईत आता तासाभराचा प्रवास फक्त 15 मिनिटांत ! गोरेगांव – मुलुंड लिंक रोडसाठी 6,301 कोटींचा खर्च, पहा Road Map..

0

पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या गोरेगाव – मुलुंड लिंक रोडच्या कामाला आता गती मिळण्याची अपेक्षा आहे. फिल्मसिटी गोरेगाव ते मुलुंडमधील खिंडी पाडा या भूमिगत दुहेरी बोगद्याच्या कामाला गती देण्यासाठी बीएमसीने सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

हे दुहेरी बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहे. सुमारे 5 किमी लांबीचा हा बोगदा 60 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सांताक्रूझ – चेंबूर, अंधेरी – घाटकोपर, जोगेश्वरी – विक्रोळी हे तीन जोड रस्ते आहेत, जे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडतात. परंतु दोन्ही उपनगरातील वाढती लोकसंख्या, रस्त्यांची कमी होणारी वाहतूक क्षमता आणि ट्रॅफिक जाम यांचा सामना करण्यासाठी बीएमसीने चौथा पर्यायी गोरेगाव – मुलुंड लिंक रोड तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

गोरेगाव – मुलुंड लिंक रोड 12.20 किमी लांबीचा असेल, त्याच्या बांधकामानंतर एक तासाचा प्रवास 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. चार टप्प्यातील या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात गोरेगावमधील फिल्मसिटी ते मुलुंडमधील खिंडीपाडा असा दुहेरी बोगदा बांधण्यात येणार आहे. प्रत्येकी तीन लेन असलेल्या या जुळ्या बोगद्यांसाठी आंतरराष्ट्रीय निविदा मागवण्यात आल्या आहेत. हा बोगदा पाच वर्षांत बांधला जाण्याची अपेक्षा आहे, त्यासाठी BMC प्रशासनाने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा बोगदा जंगलातून आणि डोंगराखाली जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत बचावासाठी 300 मीटर अंतरावर होल पॅसेज केले जाईल. या बोगद्यासाठी 6301 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. राष्ट्रीय उद्यानाजवळ 4.7 किमीचा बोगदा असणार आहे.

त्याचप्रमाणे गोरेगाव फिल्मसिटीमध्ये बोगद्यासह 1.6 किमी लांबीचा भुयारी रस्ता तयार करण्यात येणार आहे. रस्त्याखाली पाण्याची पाईपलाईन, युटिलिटी आणि इतर सेवा लाईन आहेत. हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे, त्यामुळे येथे स्फोटकांचा वापर केला जाणार नाही. त्यामुळेच बीएमसीने येथे टनेल बोअरिंग मशिनने (TBM) खोदकाम करण्याचा निर्णय घेतला आहे..

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये :-

प्रस्तावित बोगद्यांची लांबी – प्रत्येकी 4.7 किमी
– अंतर्गत व्यास (Diameter) – 13 मीटर – कमाल वेग – 80 किलोमीटर प्रति तास
– गोरेगाव – मुलुंड लिंक रोडची एकूण लांबी अंदाजे : 12.20 किमी आहे.

– गोरेगाव – मुलुंड लिंक रोडची प्रस्तावित रुंदी 45.70 मीटर
– भूमिगत बोगद्यांची खोली – 20 ते 220 मीटर
– प्रत्येकी तीन लेन असलेले समांतर बोगदे

-समांतर बोगद्यांचा व्यास 14.20 मीटर
– दोन्ही बोगद्यांमधील अंतर- 15 मीटर

Leave A Reply

Your email address will not be published.