गोवर्धन गोवंश योजना : 2022 | गाई पालनासाठी मिळवा 25 लाखापर्यंत अनुदान…
गायपालनसाठी 25 लाख रुपयांपर्यंत अनुदान देणारी एक महत्त्वापूर्ण योजना म्हणजे गोवर्धन गोवंश योजना Govardhan Govansh yojna 2022. याच योजनेकरिता राज्यातील 139 महसूल मंडळातून अर्ज मागवण्यात आले आहे. या संदर्भातील सर माहिती आपण या ‘शेतीशिवार’ मधील या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जसे की, अर्ज का करायचा ? आवश्यक कागदपत्रे? लाभ ? पात्रता ? इत्यादींविषयी त्यामुळे तुम्ही हा लेख शेवट्पर्यंत वाचा…
शेतकरी मित्रानो या योजनेच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आलं आहे. हे परिपत्रक काढून एक महत्त्वपूर्ण असे आव्हान करण्यात आलं आहे. या योजनेसाठी प्रेस नोट काढून गोवर्धन गोवंश योजनेकरता आज म्हणजे 7 मार्च 2022 पासून अर्ज मागवण्यात आले आहे. यासाठी अंतिम मुदत ही 6 एप्रिल 2022 असणार आहे.
या योनेसाठी या आधी 26 मार्च 2019 रोजी एक शासन निर्णय काढून गोवर्धन गोवंश योजना ही योजना राबवण्याकरता राज्यात मंजुरी दिली होती. ही योजना राबवण्यासाठी 34 कोटींच्या निधीची तरतूद देखील देण्यात आली आहे. परंतु 2019 नंतर कोरोनाच्या सावटामुळे तसेच सरकार बदल झाल्यामुळे गेल्या 2 वर्षांमध्ये या योजनेची अंबलबजावणी करण्यात अडथळा निर्माण झाला होता परंतु आता सगळं काही पुर्णपदावर आल्यामुळे ही योजना राबवण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.
या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या 139 महसूल मंडळांमध्ये अर्ज मागवण्यात आले असून 7 मार्च 2022 पासून ते 6 एप्रिल 2022 पर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहे.
गोवर्धन गोवंश योजनेचा उद्देश :-
(1) दुग्धोत्पादनास, शेती कामास, पशु – पैदाशीस, ओझी वाहण्याच्या कामास उपयुक्त नसलेल्या / असलेल्या गाय, वळू, बैल व वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणे.
(2) अशा पशुधनासाठी चारा, पाणी व निवाऱ्याची सोय उपलब्ध करुन देणे.
(3) गोवर्धन गोवंश सेवा केंद्रामधील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण उत्पादन कार्यक्रम राबविणे \.
(4) गोमूत्र, शेण इ. पासूना विविध उत्पादने, खत, गोबरगॅस व इतर उप-पदार्थाच्या निर्मीतीस प्रोत्साहन / चालना देणे.
(5) विविध विभागाच्या / संस्थांच्या सहकार्याने पशुसंवर्धन विषयक उपक्रम राबविणे
या अंतर्गत अनुदानपात्र गोशाळांसाठी पुढील बाबी…
(1) राज्याच्या पशुपैदाशीच्या प्रचलीत धोरणानुसार देशी गायीच्या जातीचे संवर्धन व त्यांच्या संख्येत वाढ होण्याकरीता संस्थेकडील देशी तसेच गावठी गायींमध्ये शुध्द देशी गायीच्या जातीच्या वळूचे वीर्य वापरुन कृत्रिम रेतन करुन घेणे.
(2) वरील प्रमाणे कृत्रिम रेतनाने पैदास झालेली नर वासरे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या मागणीनुसार गोठीत रेतन प्रयोगशाळेसाठी नाममात्र दराने उपलब्ध करुन घेणे
(3) वरील प्रमाणे कृत्रिम रेतनाने पैदास झालेली उर्वरीत नर वासरे व कालवडी यांची मागणीप्रमाणे करणे
(4) संस्थेमधील पशुधनामध्ये आंतरपैदास झाल्यास निर्माण होणाऱ्या नर वासरे / कालवडी यांची वाढ खुंटणे, कालवडी उशिरा माजावर येणे, वेळीच गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे इत्यादी विपरीत परीणाम होऊ शकतात. हे टाळण्यासाठी संस्थेमधील वळूचे खच्चीकरण करणे गरजेचे असेल.
(5) संस्थेने प्राप्त अनुदानाच्या खर्चाचे स्वतंत्र हिशोब ठेवावेत व सनदी लेखापालाच्या प्रमाणपत्रासह आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना सादर करावे लागतील.
(6) महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाद्वारे दुग्धव्यवसाय विभाग, स्वयंसेवी संस्था, सहकारी दूध संघ, पशुपैदासकाराच्या संघटना आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचेशी समन्वय ठेवून त्यांचा सक्रिय सहभाग मिळविणे गरजेचे असेल.
लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती : –
(1) सदरची संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असावी.
(2) संस्थेस गोवंश संगोपनाचा कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असावा.
(3) केंद्रावर असलेल्या पशुधनास आवश्यक असलेली वैरण / चारा उत्पादनासाठी तसेच पशुधन संगोपनासाठी संस्थेकडे स्वतःच्या मालकीची अथवा 30 वर्षाच्या भाडेपट्टयावरची किमान 05 एकर जमीन असावी.
(4) संस्थेने या योजनेंतर्गत मागणी केलेल्या एकूण अनुदानाच्या कमीत कमी 10 टक्के एवढे खेळते भाग – भांडवल संस्थेकडे असणे आवश्यक आहे.
(5) संस्थेचे नजीकच्या मागील 3 वर्षाचे लेखापरिक्षण झालेले असणे आवश्यक आहे. (सन 2021-22 अखेर)
(6) संस्थेस गोसेवा / गो -पालनाचे कार्य करण्यासाठी आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यासोबत करारनामा करण्याचे बंधनकारक राहील.
(7) संबंधीत संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
(8) संस्थेवर कार्यरत कर्मचारी / मजूर यांचे वेतन इ. चा खर्च संस्थेकडून अदा करण्यासाठी / संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी.
(9) या योजनेंतर्गत ज्या बाबीसाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल , त्याच बाबीसाठी भविष्यात कोणतेही अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार नाही.
अ ) या योजने अंतर्गत प्रामुख्याने खालील मुलभूत सुविधाकरीता अनुदान देय ठरेल…
(1) पशुधनासाठी नवीन शेडचे बांधकाम, चाऱ्याची, पिण्याची पाण्याची व्यवस्था
(2) वैरण उत्पादनासाठी पाण्याच्या उपलब्धेकरिता विहीर / बोअरवेल ,
(3) चारा कटाई करण्यासाठी विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्र,
(4) मुरघास प्रकल्प,
(5) गांडूळखत निर्मिती प्रकल्प, गोमूत्र, शेण यापासून उत्पादन निर्मिती प्रकल्प व विक्री केंद्र इत्यादी..
हे अनुदान 2 टप्प्यात मिळणार असून पहिला टप्पा हा 15 लाखांचा आणि दुसरा टप्पा 10 लाखांचा मिळणार आहे.
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर खाली दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज भरून तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा…
PDF FILE :- अर्ज डाउनलोड करा
संपूर्ण शासन निर्णय पहा :- गोवर्धन गोवंश योजना : 2022