Take a fresh look at your lifestyle.

महागाई भत्ता : DA मध्ये 4% वाढ कन्फर्म ! सणासुदीत कर्मचाऱ्यांच्या पगारात 27,312 रुपयांची वाढ होणार, जाणून घ्या कसे ?

सणासुदीच्या दिवसांत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. 1 जुलै 2023 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार हे ठरवलं जाणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सरकार याबाबत घोषणा करू शकते. महागाई भत्त्यात 4% वाढ होईल असे AICPI निर्देशांक क्रमांकावरून स्पष्ट संकेत मिळाले आहे. मात्र, याचा निर्णय सरकार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेईल व मंत्रिमंडळात त्याला मंजुरी दिली जाईल..

DA मध्ये 4 टक्क्यांची वाढ होणार..

अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) च्या मासिक आकड्यांच्या आधारे महागाई भत्ता (DA) ठरवला जातो. जुलै 2023 पासून लागू होणार्‍या महागाई भत्त्याची संख्या जानेवारी ते जून या कालावधीत AICPI निर्देशांकाद्वारे ठरवली जाते. सहा महिन्यांच्या आकड्यांचा कल पाहिल्यास, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होणार हे निश्चित आहे. खाली दिलेल्या कॅल्क्युलेशनवर एक नजर टाका..

अशा प्रकारे होणार DA चे कॅल्क्युलेशन..

तज्ञांच्या मते, जुलै 2023 मध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांपेक्षा कमी होणार नाही. यामागील तर्क असा आहे की, किंमत निर्देशांकाच्या गुणोत्तरामध्ये दाखविलेल्या हालचालीमुळे DA स्कोअर 46 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. जूनमध्ये निर्देशांक 136.4 अंकांवर होता. यावर आधारित कॅल्क्युलेशन पाहिल्यास, DA स्कोअर 46.24 वर पोहोचला आहे. याचा अर्थ DA मध्ये एकूण 4% वाढ होईल. कारण, DA राउंड आकड्यांमध्ये दिलेला आहे आणि जर तो 0.51 पेक्षा कमी असेल तर तो फक्त 46 टक्के मानला जाईल..

कसा कॅल्कुलेट होणार DA Hike..

डिसेंबर 2023 मध्ये, निर्देशांक क्रमांक 132.3 अंक होता, ज्यामुळे DA चा एकूण स्कोअर 42.37 टक्के होता. यानंतर, जानेवारीत निर्देशांक 132.8 वर पोहोचला आणि डीए स्कोअर 43.08 पर्यंत वाढला. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याचा स्कोअर ठरवला जातो. खाली दिलेलं कॅल्क्युलेशन पहा..

Month AICPI Index DA % increase
Jan-2023 132.8 43.08
Feb-2023 132.7 43.79
Mar-2023 133.3 44.46
Apr-2023 134.2 45.06
May-2023 134.7 45.58
Jun-2023 136.4 46.24

46% DA वाढ कन्फर्म..

वर दिलेलं कॅल्क्युलेशन बघितलं तर 7व्या वेतन आयोगात पुन्हा एकदा 4 टक्के वाढ होईल. यामुळे एकूण महागाई भत्ता 46 टक्क्यांवर जाईल. त्याची अंमलबजावणी 1 जुलै 2023 पासून होणार आहे. मात्र, त्याच्या घोषणेसाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा दिवाळी आधी त्याची घोषणा केली जाऊ शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैपासून ते जाहीर होईपर्यंत थकबाकी (DA Arrears) मिळेल..

पगार किती वाढणार ?

1. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन :- रु.18,000
2. नवीन महागाई भत्ता (46%) :- रु 8280 / महिना
3. आत्तापर्यंत महागाई भत्ता (42%) :- रुपये 7560 / महिना आहे.
4. महागाई भत्ता किती वाढणार ? 8280 – 7560 = रु 720 / महिना
5. वार्षिक पगारात वाढ 720X12 = रु. 8640

रु. 56,900 च्या बेसिक सॅलरीवर कॅल्क्युलेशन पहा..

1. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन :- रु 56,900
2. नवीन महागाई भत्ता (46%) :- रु. 26,174 / महिना
3. आत्तापर्यंत महागाई भत्ता (42%) :- रु. 23,898 / महिना
4. किती महागाई भत्ता वाढणार ? 26,174 – 23,898 = रु 2276 / महिना
5. वार्षिक पगारात वाढ 2276 X 12 = रु. 27312