Take a fresh look at your lifestyle.

BREAKING : 50,000 रु. प्रोत्साहन अनुदान संदर्भात आत्ताची मोठी बातमी ! सर्व बँकांना सूचना,5 सप्टेंबर 2022 पर्यंत…

शेतीशिवार टीम : 22 ऑगस्ट 2022 :- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय मागे काही दिवसांपूर्वी घेतला असून, राज्यातील एकही पात्र शेतकरी या प्रोत्साहन अनुदान लाभापासून वंचित राहू नये याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. यासाठी तब्बल 4700 कोटींचा खर्च अपक्षेत असून सरकारने मंजुरी दिली आहे.

सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी आयोजित प्रशिक्षण बैठकीत बँका व सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, त्याचबरोबर प्रोत्साहन पर लाभ योजनेत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या अंतिम याद्या 5 सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सहकार विभागाने ठेवले आहे.

आणि शासनाच्या 29 जुलै 2022 च्या आदेशानुसार प्रोत्साहनपर लाभासाठी शेतकऱ्यांची पीक कर्जबाबतची माहिती ऑनलाईनद्वारे भरण्याबाबतचे मार्गदर्शन तसेच इतर भेडसावणाऱ्या अडचणी व शंकांचे निरसन यावेळी आयुक्तांनी केले आहे.

याव्यतिरिक्त बैठकीनंतर माहिती देतांना अपर निबंधक ज्ञानदेव मुकणे म्हणाले, प्रोत्साहनपर लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार (SOP) शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणे आणि शासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे सर्व माहिती संबंधित बँकांनी महाऑनलाईन वर बिनचूक भरावी.

त्यामुळे प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता या कर्जमुक्ती योजने-अंतर्गत प्रोत्साहन पर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात सणासुदीच्या दिवसांत म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या हप्त्या पर्यंत टप्याटप्याने वितरित केला जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! अखेर 50,000 अनुदानाचा GR आला । पहा, तुम्हाला मिळणार का लाभ ; कोण पात्र, कोण अपात्र ? शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा