Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो, गेल्या वर्षी किती % मिळाले ? 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना ‘ही’ Govt. बँक देतेय 15,000 रु. स्कॉलरशिप, पहा, अर्ज प्रोसेस…

शेतीशिवार टीम : 25 सप्टेंबर 2022 :- देशातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासासाठी सरकारी (Govt) आणि गैर-सरकारी (Non-Govt) शिष्यवृत्ती (Scholarship) खूप मोठं योगदान आहे. शिष्यवृत्ती ही आर्थिक मदत आहे, जी विद्यार्थ्याला पुढील शिक्षण चालू ठेवण्यासाठी दिली जाते.

एसबीआय (SBI) बँकही फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. SBI फाउंडेशन भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी, आरोग्य सेवा सुधारण्यासाठी, शिक्षण आणि उपजीविकेच्या संधी वाढवण्यासाठी, ग्रामीण विकास सुधारण्यासाठी इ. त्यापैकीच एक म्हणजे एसबीआय (SBI) आशा शिष्यवृत्ती हा विद्यार्थ्यांच्या चांगल्या शिक्षणासाठीचा एक उपक्रम आहे, या अंतर्गत इयत्ता 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 15 हजार शिष्यवृत्ती (Scholarship) दिली जाते. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर आहे.

एसबीआय फाउंडेशन आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम (ASHA Scholarship Program) चालवते ज्या अंतर्गत इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 15,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

एसबीआय (SBI) फाऊंडेशनने एज्युकेशन वर्टिकल – इंटिग्रेटेड लर्निंग मिशनच्या अनुषंगाने एसबीआय (SBI) आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम : 2022 लाँच केला आहे. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर दिली असून विद्यार्थ्यांनी वेळेवर अर्ज करण्याचे आवाहन केलं आहे.

SBI आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम 2022 : पात्रता (Eligibility)

1) 1 इयत्ता 6 वी ते इयत्ता 12 वी चे विद्यार्थी SBI आशा शिष्यवृत्ती (Scholarship) कार्यक्रमासाठी पात्र असणार आहे.

2) या कार्यक्रमासाठी अर्ज करण्यासाठी, विद्यार्थ्याने मागील वर्गात किमान 75% गुण मिळवलेले असावेत.

3) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सर्व स्रोतांमधून 3 लाख किंवा त्याहून कमी असावे.

4) ही शिष्यवृत्ती फक्त पॅन इंडियाच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.

आवश्यक कागदपत्रे :-

1) विद्यार्थी ज्या वर्गात आहे त्या वर्गाच्या पहिल्या वर्षाची मार्कशीट
2) सरकारने जारी केलेलं ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स)
3) नवीन वर्गात प्रवेशाचा पुरावा (फी स्लिप, प्रवेश पत्र, शाळेचे ओळखपत्र)
4) विद्यार्थ्यांचे बँक अकाउंट डिटेल्स
5) उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म 16, उत्पन्नाचा पुरावा, इनकमस्लिप)
6) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचा फोटो

SBI आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम : 2022 साठी अर्ज कसा करावा ?

1) SBI आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम : 2022 साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट www.buddy4study.com ला भेट द्यावी लागेल.

2) तुम्हाला वेबसाइटला भेट देऊन स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. विद्यार्थ्यांना मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि जी-मेल आयडीद्वारे रजिस्ट्रेशन करावे लागेल. जर तुम्ही आधीच रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही थेट लॉगिन करून फॉर्म भरू शकता…

3) रजिस्ट्रेशन केल्यानंतर, तुम्ही थेट SBI आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम : 2022 अर्जावर पोहोचाल.

4) SBI आशा शिष्यवृत्ती कार्यक्रम : 2022 च्या अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.

5) सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावी लागतील, टर्म आणि कंडिशनवर क्लिक केल्यानंतर, फॉर्म प्रिव्हिव्ह करा.

6) फॉर्ममध्ये भरलेली सर्व माहिती तपासा आणि नंतर सबमिट बटणावर क्लिक करून फॉर्म सबमिट करा आणि या अर्जाची PDF बनवा आणि प्रिंट देखील घ्या…

टीप :- विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मोबाईलवर फॉर्म भरण्यास अडचण येत असेल तर तुम्ही जवळच्या CSC सेंटरला कागदपत्रांसह भेट द्या.