Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी । 1 ली-12वी ते पदवीधर विद्यार्थ्यांना 75,000 रु. शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरु ; पहा पात्रता अन् ऑनलाईन प्रोसेस…

शेतीशिवार टीम : 18 ऑगस्ट 2022 :- देशातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासासाठी सरकारी (Govt) आणि गैर-सरकारी (Non-Govt) शिष्यवृत्ती (Scholarship) खूप मोठं योगदान आहे. शिष्यवृत्ती ही आर्थिक मदत आहे जी विद्यार्थ्याला पुढील शिक्षण चालू ठेवण्यासाठी दिली जाते. विविध वयोगटातील आणि पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु, प्रत्येक शिष्यवृत्तीसाठी भिन्न पात्रता निकष (Legibility Criteria) असू शकतो. कोविड महामारी दरम्यान, अशा अनेक शिष्यवृत्ती ज्या मुलांनी आपले पालक गमावले त्यांच्यासाठी आर्थिक साहाय्य म्हणून समोर आल्या.

योग्य शिष्यवृत्ती आणि फेलोशिप प्रोग्राम तुम्हाला चांगली विद्याशाखा आणि नोकऱ्या देऊ शकतात, जे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यास मदत करू शकतात. काही स्टडी अँब्रॉड स्कॉलरशिप्स तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये अत्यंत कमी फीमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकतात. अशा परिस्थितीत, अशा शिष्यवृत्तींबद्दल आपण जाणून घेणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला ऑगस्टमध्ये अर्ज करावा लागणार आहे.

*** HDFC बँक परिवर्तन ECS शिष्यवृत्ती 2022-23 :-

HDFC बँकेने इयत्ता पहिली ते पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणली आहे. ही शिष्यवृत्ती समाजातील वंचित घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आहे.

* पात्रता निकष (Legibility Criteria) काय आहे ?

1) या शिष्यवृत्तीसाठी फक्त भारतीय नागरिकच अर्ज करू शकतात.
2) शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारा विद्यार्थी इयत्ता पहिली ते बारावी, डिप्लोमा, पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावरील असावा.
3) उमेदवाराने त्याच्या / तिच्या आधीच्या वर्गात कमीत कमी 55% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि त्याचे / तिच्या कुटुंबाचे उत्पन्न वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
4) या शिष्यवृत्तीमध्ये, गेल्या तीन वर्षांत वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटातून जात असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाईल.
5) या शिष्यवृत्तीसाठी उमेदवाराला 75,000 रुपये दिले जातील.
6) शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2022

* आवश्यक कागदपत्रे : –

1) पासपोर्ट आकाराचा फोटो
2) मागील वर्षाचे मार्कशीट (2021-22 )
3) आधार कार्ड
4) बोनाफाइड प्रमाणपत्र (2021-22 )
5) अर्जदार बँकेचे पासबुक / रद्द केलेला चेक
6) उत्पन्नाचा दाखला.

* किती मिळणार शिष्यवृत्ती (Scholarship) :-

1) इयत्ता 1 ली. ते 6 वी. साठी:- 15,000 रुपये .
इयत्ता 7 वी. ते 12 वी. साठी :- 18,000 रुपये .
डिप्लोमा कोर्ससाठी :- 20,000 रुपये
सामान्य पदवी अभ्यासक्रमांसाठी :- 30,000 रुपये .
व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी :- 50,000 रुपये
सामान्य पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी :- 35,000 रुपये
व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी :- 75,000 रुपये .

* शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

सर्वप्रथम, https://www.buddy4study.com/page/hdfc-bank-parivartans-ecs-scholarship भेट द्या…

पोर्टल ओपन केल्यानंतर Apply Now बटणावर क्लिक करा.

अर्ज पेज वर नोंदणीकृत ID वापरून Buddy4Study मध्ये लॉग इन करा.

Buddy4 Study वर नोंदणीकृत नसल्यास आपल्या ईमेल / मोबाईल / फेसबुक / जीमेल खात्यासह Buddy4Study वर रजिस्टर्ड करा.

तुम्हाला आता HDFC बैंक परिवर्तन ची ECS शिष्यवृत्ती अर्ज फॉर्म पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल.

अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी Start Application  बटणावर क्लिक करा.

ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्जामध्ये आवश्यक तपशील भरा.

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

Terms and conditions स्वीकारा आणि Preview वर क्लिक करा.

जर अर्जदाराने भरलेले सर्व डिटेल्स प्रिव्हिव्ह स्क्रीनवर योग्यरित्या दर्शवत असतील तर, अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘ Submit बटणावर क्लिक करा.