7th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी । सरकारने प्रमोशनचे नियम बदलले, 38% DA वाढवण्याआधीच अध्यादेश जारी, पहा…
7th Pay Commission Latest News : केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक महागाई भत्ता (DA) आणि दिलासा वाढण्याची वाट पाहत आहेत. त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत घोषणा केली जाणार आहे.
सणासुदीचा हंगाम सुरू होताच केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळणार आहे. मात्र, त्याआधीच सरकारने नवा अध्यादेश जारी केला आहे. हा आदेश कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीशी (Promotion) संबंधित आहे. सरकारने पदोन्नती साठी किमान पात्रता सेवांच्या नियमांमध्ये (Minimum Qualifying Services) बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
किमान सेवा स्थितीचे नियम बदलणार…
डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगने (DoPT) याबाबत कार्यालयीन निवेदन जारी केलं आहे. यामध्ये पदोन्नतीसाठी (Promotion) किमान सेवा अटीच्या नियमात बदल करण्याची माहिती देण्यात आली आहे. मंत्रालय आणि विभागांनी नोकऱ्यांमधील भरती आणि सेवा नियमांमधील बदलांची अंमलबजावणी करावी, असे सांगण्यात आलं आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, पे ब्रँड आणि ग्रेड ला लेव्हल पे मॅट्रिक्समध्ये समाविष्ट केले जाणार आहे.
प्रमोशनसाठी किती वर्षांच्या नोकरीची गरज ?
प्रमोशनच्या नियमांच्या बदलांनुसार,
लेव्हल 1 आणि लेव्हल 2 साठी 3 वर्षांची सर्व्हिस आवश्यक आहे.
लेव्हल 6 ते लेव्हल 11 साठी 12 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
लेव्हल 7 आणि लेव्हल 8 साठी 2 वर्षाची नोकरी आवश्यक आहे.
कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये किती होणार वाढ :-
जुलै 2022 साठी महागाई भत्ता (DA) वाढवला जाणार आहे. तो 1 जुलै 2022 पासून लागू केला जाणार आहे . म्हणजे सप्टेंबरमध्ये पैसे भरल्यास, जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची थकबाकीही सरकार देणार आहे. सूत्रांनुसार, 28 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात याची घोषणा होणार आहे.
दसरा-दिवाळीपूर्वी या पेमेंटमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे. एकूण महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. सध्या 34% DA ने कर्मचाऱ्यांना लाभ मिळत आहे.
पहा संपूर्ण डिटेल्स :-
SL. No. | From | To | Minimum Qualifying Service for Promotion |
1 | Level 1 | Level 2 | 3 Years |
2 | Level 2 | Level 3 | 3 Years |
3 | Level 2 | Level 4 | 8 Years |
4 | Level 3 | Level 4 | 5 Years |
5 | Level 4 | Level 5 | 5 Years |
6 | Level 4 | Level 6 | 10 Years |
7 | Level 5 | Level 6 | 6 Years |
8 | Level 6 | Level 7 | 5 Years |
9 | Level 6 | Level 8 | 6 Years |
10 | Level 6 | Level 9 | 8 Years |
11 | Level 6 | Level 10 | 10 Years |
12 | Level 6 | Level 11 | 12 Years |
13 | Level 7 | Level 8 | 2 Years |
14 | Level 7 | Level 9 | 3 Years |
15 | Level 7 | Level 10 | 5 Years |
16 | Level 7 | Level 11 | 9 Years |
17 | Level 8 | Level 9 | 2 Years |
18 | Level 8 | Level 10 | 4 Years |
19 | Level 8 | Level 11 | 8 Years |
20 | Level 9 | Level 10 | 2 Years |
21 | Level 9 | Level 11 | 7 Years |
22 | Level 10 | Level 11 | 5 Years |
23 | Level 11 | Level 12 | 5 Years |
24 | Level 11 | Level 13 | 10 Years |
25 | Level 12 | Level 13 | 5 Years |
26 | Level 12 | Level 13A | 6 Years |
27 | Level 13 | Level 13A | 2 Years |
28 | Level 13 | Level 14 | 3 Years |
29 | Level 13A | Level 14 | 2 Years |
30 | Level 14 | Level 15 | 3 Years |
31 | Level 15 | Level 16 | 1 Year |
32 | Level 15 | Level 17 | 2 years |
33 | Level 16 | Level 17 | 1 Year |