Take a fresh look at your lifestyle.

महागाई भत्ता : खुशखबर… DA मध्ये 38% वाढ, पगारात 15,144 रुपये जास्त येणार, पण कधी ? ‘या’ तारखेला पगारासह खात्यात होणार जमा !

7th pay commission latest news on DA Hike : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अखेर तो दिवस आला आहे, आता वाढलेल्या महागाई भत्त्याचे (DA) पैसे कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. अलीकडेच महागाई भत्ता 38 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. परंतु खात्यात पेमेंट येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. कारण, सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याची घोषणा करणार आहे. महागाई भत्त्यात 4% वाढ झाली आहे. AICPI-IW निर्देशांकाद्वारे चलनवाढीचा डेटा DA मध्ये वाढ दर्शवितो. यावेळी जुलैपासून 4% DA वाढवण्यात आला आहे.

38% झाला महागाई भत्ता :-

7व्या वेतन आयोगांतर्गत आता सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% ऐवजी 38% डीए (DA) आणि डीआर (DR) देण्यात येणार आहे. परंतु, तो अद्याप दिलेला नाही. AICPI निर्देशांक 129 च्या वर गेला आहे. त्यामुळे महागाई भत्त्यात 4% वाढ झाली आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांना मूळ वेतन श्रेणीनुसार एकूण वेतन वाढीची कल्पना येऊ शकते. आता महागाई भत्ता कधी मिळणार हा प्रश्न आहे. तज्ञांच्या मते, सरकार सप्टेंबर महिन्यात नवरात्री दरम्यान याची घोषणा करू शकते आणि ते 30 सप्टेंबर 2022 च्या पगारात वाढ करून दिलं जाईल…

कसं होणार DA calculation :-

DA चा पुढील हप्ता सप्टेंबरच्या पगारासह द्यायचा आहे. महागाई भत्त्याची गणना कशी करायची याचा अंदाज लावणे अगदी सोपे आहे. महागाई भत्ता (डीए वाढ) 4 टक्क्यांनी वाढवल्यानंतर, त्याची गणना मूळ वेतनावर केली जाऊ शकते. जर एखाद्याचा पगार 20,000 रुपये असेल तर 4 टक्के दराने त्याचा पगार एका महिन्यात 800 रुपयांनी वाढेल.

या फॉर्मूल्याने केलं जातं calculation :-

महागाई भत्ता मोजण्यासाठी एक सूत्र आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी सूत्र आहे [(गेल्या 12 महिन्यांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी (AICPI) – 115.76/115.76]×100. आता जर आपण PSU (सार्वजनिक क्षेत्रातील युनिट) मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या महागाई भत्त्याबद्दल बोललो तर त्याची गणना करण्याची पद्धत आहे- महागाई भत्ता टक्केवारी = (गेल्या 3 महिन्यांच्या ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी (आधारभूत वर्ष 2001=100)- 126.33) )x100

पगार किती वाढणार, जाणून घ्या, DA Calculation :-

7 व्या वेतन आयोगानुसार अधिकारी श्रेणीच्या वेतनात बंपर वाढ होणार आहे. जर एखाद्याचे मूळ वेतन 31,550 रुपये आहे. याचा हिशोब केला तर…

मूळ वेतन (Basic Pay) :- 31550 रुपये
अंदाजे महागाई भत्ता (DA) – 38% – रु 11,989 प्रति महिना
सध्याचा महागाई भत्ता (DA) – 34% – रु 10,727 प्रति महिना
महागाई भत्ता (DA) 4% ने वाढवल्यास – Rs 1262 (दर महिन्याला) अधिक मिळेल
वार्षिक महागाई भत्ता दिला – 4% वाढीनंतर रु. 15,144 (38% DA वर)

कमाल मूळ पगाराची (Basic Salary) Calculation :- 

जर तुम्ही कमाल पगाराच्या श्रेणीमध्ये Calculation केलं, तर 56,900 रुपयांच्या मूळ पगारावर दरमहा 21622 रुपये DA म्हणून उपलब्ध होईल. अशाप्रकारे त्यांचा पगार दरवर्षी 27312 रुपयांनी वाढणार आहे. एकूण महिन्यात 2276 रुपयांची वाढ होईल. जर आपण एकूण वार्षिक महागाई भत्त्याबद्दल बोललो तर, त्याला 2,59,464 रुपये मिळतील. सध्या त्यांना 2,32,152 रुपये मिळत आहेत.