Take a fresh look at your lifestyle.

BREAKING : सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा दुहेरी झटका : पहा, DA वाढवण्याबाबतचं नवं अपडेट, GPF च्या व्याजदरातही मोठी घट…

शेतीशिवार टीम : 18 जुलै 2022 :- सणासुदीचा हंगामाने दार ठोठावलं आहे. मात्र या महागाईच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने दुहेरी झटका दिला आहे.एकीकडे दैनंदिन वस्तूंवर GST वाढवण्यात आला आहे, तर दुसरीकडे 1 जुलैपासून देय असलेला ‘महागाई भत्ता’ म्हणजेच DA च्या दरांमध्ये वाढ करण्यास नकार दिला आहे.

हे तर ठीक होतं पण आता या सगळ्याच्या पलीकडे GPF आणि इतर योजनांवरील व्याजदरातही वाढ करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारने 1 जुलै 2022 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत 2022-23 या वर्षात जनरल प्रॉव्हिडंट फंड (GPF) आणि इतर तत्सम निधीच्या सदस्यांच्या एकूण ठेवींवर व्याजदर 7.1% ठेवला आहे. हा दर 1 जुलै 2022 पासून लागू होणार आहे.

कोरोना काळातील DA मिळाला नाही ! 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्ता (DA) वाढीचं गिफ्ट मिळतं. कोरोनाच्या काळात बर्‍याच काळापासून DAमध्ये वाढ झाली नव्हती. गतवर्षी DAचे दर वाढविण्यात आले होते, मात्र दीड वर्षाच्या थकबाकीबाबत सरकारने कोणतेही आश्वासन दिले नाही. यावर्षी DA च्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती.

गेल्या मार्चमध्ये केंद्र सरकारने ‘महागाई भत्ता’ 3% वाढवला होता. 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना या दरवाढीचा फायदा झाला. 3 टक्क्यांच्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 31 टक्क्यांवरून 34% करण्यात आला आहे. परंतु, जुलैपासून किती महागाई भत्ता (DA) वाढणार, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही…

आता व्याजदरही 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्के करण्यात आला !

आता केंद्र सरकारनेही अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ केलेली नाही. सध्या GPF वर वार्षिक व्याजदर 7.1% ठेवण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे जनरल प्रॉव्हिडंट फंड (GPF) वर गेल्या जानेवारीतही 7.1% व्याजदर होता. म्हणजेच 1 जानेवारी 2022 ते 31 मार्च 2022 पर्यंत व्याजदर 7.1% ठेवण्यात आला होता.

हे व्याजदर GPF द्वारे संरक्षित कर्मचार्‍यांच्या ठेवी तसेच इतर निधीच्या सदस्यांना लागू आहेत. वाढीव व्याजदराचं गिफ्ट आता मिळेल, अशी आशा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना होती.अनेक दिवसांपासून व्याजदरात कोणतीही वाढ झालेली नाही. एप्रिल 2020 मध्ये केंद्र सरकारने GPF वरील व्याजदर 7.9 टक्क्यांवरून 7.1% केला. त्यानंतर व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे…

कर्मचाऱ्यांनी वाढवले GPF मध्ये शेअर्स :-

हा व्याजदर सामान्य भविष्य निर्वाह निधी (Central Services), अंशदायी भविष्य निर्वाह निधी (India), अखिल भारतीय सेवा भविष्य निर्वाह निधी, राज्य रेल्वे भविष्य निर्वाह निधी, सामान्य भविष्य निर्वाह निधी (Defense Services), भारतीय आयुध विभाग भविष्य निर्वाह निधी, भारतीय आयुध निर्माणी कामगार भविष्य निर्वाह फंड, इंडियन नेव्ही डॉक वर्कर्स भविष्य निर्वाह निधी, संरक्षण सेवा अधिकारी भविष्य निर्वाह निधी आणि सशस्त्र दल कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर लागू होईल.

GPF मध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या किमान 6% रक्कम कापली जाते. या रकमेवरील व्याज बँकांच्या तुलनेत जास्त असल्याने अनेक कर्मचारी आपला हिस्सा वाढवतात. GPF मध्ये, अधिक पगार कापला जातो जेणेकरून कर्मचार्‍यांना त्यांच्या मोठ्या गरजेच्या वेळी त्याचा वापर करता येईल. कर्मचारी त्यांच्या GPF च्या 90% रक्कम काढू शकतात.

मात्र, याबाबतच्या अटी व शर्ती बदलत राहतात. मुलांचे शिक्षण, लग्न, घर बांधणे किंवा त्यासाठी मालमत्ता खरेदी करणे, घर घेणे, वडिलोपार्जित घराची दुरुस्ती करणे आणि गृहकर्ज फेडणे यासाठी GPFची रक्कम उपयोगी पडते. या कारणास्तव कर्मचारी GPF खात्यात त्यांच्या मूळ पगारापेक्षा जास्त रक्कम जमा करतात…