Take a fresh look at your lifestyle.

7th Pay Commission । फक्त 12 दिवस अजून…! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 27 हजारांची वाढ ; ‘या’ दिवशी होणार शिक्कामोर्तब…

शेतीशिवार टीम : 22 जुलै 2022 :- सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळण्यासाठी आता फक्त काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील महिन्यात सरकार वाढीव DA वर शिक्कामोर्तब करणार आहे,

मीडिया रिपोर्ट्स नुसार, सरकार बुधवार, 3 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत DA वाढवण्याबाबत चर्चा करणार आहे. म्हणजेच कर्मचार्‍यांचा DA वाढण्यास फक्त 12 दिवस उरले आहेत.

मे महिन्यात AICPI निर्देशांकात वाढ झाल्यामुळे 4% DA वाढण्याची अपेक्षा वाढली आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 34 टक्क्यांवरून 38% होणार आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात 27 हजारांहून अधिक वाढ होऊ शकते.

खरं तर, ऑल इंडिया कंज्यूमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स डेटा 127 अंकांपेक्षा जास्त आहे. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) डेटाच्या आधारे DA निश्चित केला जातो. जूनची आकडेवारी येणे बाकी आहे. हेही जास्त राहिल्यास ऑगस्ट महिन्यात महागाई भत्ता वाढण्याची खात्री आहे.

38% होणार DA :-

पूर्वी 34% DA मिळणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता 38% DA (महागाई भत्ता) मिळणार आहे.

38% DA (महागाई भत्ता) झाल्यास पगारात होणार इतकी वाढ…

कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56,900 रुपये आहे, 38% टक्के महागाई भत्ता झाला तर त्यांना 21,622 रुपये DA मिळेल. सध्या 34% DA दराने 19,346 रुपये 34% दराने मिळत आहेत. DAमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाल्याने पगारात 2,276 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच वर्षाला सुमारे 27,321 रुपयांची वाढ होणार आहे.

50 लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा :-

सरकार वर्षातून दोनदा DA वाढवते. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने DA मध्ये एकदाच वाढ केली आहे. सध्या डीए 34% आहे. त्यात आणखी 4 टक्क्यांची वाढ झाली तर ती 38% होईल. या निर्णयाचा फायदा 50 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.