BREAKING : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ; मतदान कार्डसाठी आता वयाच्या ‘या’ वर्षीच करता येणार अर्ज ; पहा कशी कराल नोंदणी…
शेतीशिवार टीम : 29 जुलै 2022 :- निवडणुकीत युवकांचा सहभाग वाढविण्याच्या हेतूने 17 वर्षांहून अधिक वयाच्या युवकांनाही आगाऊ मतदार नोंदणीची मुभा देण्याचा स्तुत्य निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी घेतला.
18 वर्षे पूर्ण होताच मतदार म्हणून हक्क बजावण्यासाठी 17 पेक्षा अधिक वयाचे तरुण आतापासूनच अर्ज करू शकणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार व निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने एक निवेदन जारी केले आहे.
राज्यांमधील निवडणूक व्यवस्थेत तांत्रिक सक्षम तोडगा काढण्याचे निर्देश यातून देण्यात आले आहेत . त्यानुसार, युवकाना आपले नाव आगाऊ नोंदवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या देशातील मतदार याद्या दर तीन महिन्यांनी अपडेट करण्यात येत आहेत. यात, पात्र युवकांना त्या वर्षीच्या पुढील तिमाहीत 18 वर्षे पूर्ण होताच नोंदणीकृत करणे शक्य झाले आहे, असे आयोगाने स्पष्ट केले. गत 1 एप्रिल, 1 जुलै आणि 2023 सालच्या 1 ऑक्टोबरला 18 वर्षे पूर्ण होणारे तरुण मतदार म्हणून स्वतःचे नाव आतापासून नोंदवू शकणार असल्याचेही आयोगाने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
उल्लेखनीय बाब अशी की, देशात काही वर्षांपूर्वी 1 जानेवारी किंवा त्या अगोदर 18 वर्षांच्या तरुणांना मतदार सूचित नाव नोंदवण्यासाठी पात्र मानले जात होते. मात्र,1 जानेवारीनंतर 18 वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार बनण्यासाठी एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागत होती.
आता निवडणूक अधिनियमात बदल केल्यानंतर 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबरला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदार म्हणून नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र (PDF) मतदार यादी : 2022: –
निवडणूक आयोगाकडून नव्या मतदार याद्या प्रसिद्ध । मतदार यादीत आपलं नाव शोधण्यासाठी तसेच मतदार यादी 2022 डाउनलोड करण्याची प्रोसेस व नोंदणी करण्यासाठी :- इथे क्लिक करा