Take a fresh look at your lifestyle.

Ahmednagar Drought : जिल्ह्यातील ‘या’ 96 महसूली मंडळात दुष्काळ ! शेती वीजबिलासह ‘या’ 6 सवलती लागू करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश..

अहमदनगर जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पावसाच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण 750 मि.मि.पेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा 14 तालुक्यातील 96 महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती लागू केलेल्या 14 तालुक्यातील 96 महसूली मंडळाना सवलती लागू करण्याचे आदेश महसूलमंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आलेले तालुके व महसुल मंडळामध्ये पारनेर तालुक्यातील भाळवणी, सुपा, वाडेगव्हाण, वडझिरे, निघोज, टाकळी ढोकेश्वर, पळशी या महसूल मंडळाचा समावेश आहे. नगर तालुक्यातील सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेऊर, चिंचोडी पाटील, वाळकी, चास, रुई छत्तीशी या मंडळाचा तर श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेनगाव, चिंबळा, देवदैठण, कोळगाव या महसूल मंडळाचा समावेश आहे.

दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे जिल्ह्यातील 25 तालुक्यातील 96 महसूल मंडळात शासनाने विविध सवलती लागू केल्या आहेत. यामध्ये जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलतीचा समावेश असणार आहे.

दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या महसूल मंडळातील संबंधित विभागाच्या प्रमुखांनी गावातील खातेदारांना लागू करण्यात आलेल्या सवलती व उपाययोजना देण्याची व्यवस्था करावी, असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

या 14 तालुक्यातील 96 महसूली मंडळामध्ये दुष्काळ..