Take a fresh look at your lifestyle.

Ahmednagar Job : नगरमधील ‘या’ 2 कॉलेजमध्ये नोकरीची मोठी संधी ; तब्बल 208 रिक्त जागा ; पहा मुलाखतीची तारीख अन् वेळ…

शेतीशिवार टीम : 27 जुलै 2022 :- संगमनेर, अकोले, भंडारदरा, सिन्नर, प्रवरानगर आणि इतर परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी असलेली शिक्षण प्रसारक संस्था अहमदनगर अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. यामध्ये तब्बल 208 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती होणार असून अर्ज मागवण्यात आले आहे.

या अंतर्गत डी.जे. मालपाणी वाणिज्य आणि बी.एन.सारडा विज्ञान महाविद्यालय, घुलेवाडी या महाविद्यालयात या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून इच्छुक उमेदवारांनी 06 ऑगस्ट 2022 रोजी मुलाखतीला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे.

रिक्वायरमेंट डिटेल्स : शिक्षण प्रसारक संस्था, संगमनेर (अहमदनगर) भरती.

पदसंख्या :- 208 रिक्त जागा

नोकरीचे ठिकाण :- अहमदनगर

निवड पद्धत :- मुलाखतीमध्ये वॉक – इन – इंटरव्ह्यू

पत्ता : एस. एन. आर्ट्स, डी. जे. मालपाणी कॉमर्स आणि बी. एन. सारडा सायन्स कॉलेज, घुलेवाडी, पुणे नाशिक हायवे (NH – 50), संगमनेर जिल्हा अहमदनगर – 422 605

पात्रता आणि अटी :

1) विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली, महाराष्ट्र सरकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमांनुसार पात्रता.

2) उमेदवारांना SET / NET / Ph.D ला प्राधान्य दिले जाईल.

3) उमेदवाराने मुलाखतीच्या वेळी सर्व ओरिजिनल कागदपत्रांसह संपूर्ण बायोडेटा सादर करावा.

5) मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA देय असणार नाही.

6) राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अपंग व्यक्ती आणि महिला उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

7 ) सामील झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत NET पडताळणी करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची असेल.

9) उमेदवारांनी मुलाखतीसाठी सकाळी 9.00 वाजता कार्यालयात हजर राहावे.

टीप :-  ही जाहिरात आमच्या कॉलेजच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी कॉलेज कॅम्पसमध्ये कोविड – 19 साठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नियमांचे पालन केले पाहिजे.

अधिकृत वेबसाईट : www.sangamnercollege.edu.in

PDF जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा