Take a fresh look at your lifestyle.

PM किसानचा हप्ता आला, पण नमो शेतकरी महासन्मान योजनेचा कधी ? राज्यातील ‘हे’ 32 लाख शेतकरी राहणार लाभापासून वंचित..

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे निकष हे राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान योजनेला लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे 71 लाख शेतकऱ्यापैकी निकषांची पूर्तता होत नसल्याने 32 लाख 37 हजार शेतकरी या योजनेच्या पहिल्या हप्त्यापासून वंचित राहणार असल्याची माहिती सरकारने एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात विधान परिषदेत दिली आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याबाबत राष्ट्रवादीचे सदस्य अमोल मिटकरी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात किसान सन्मान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांची वसुली आणि शेतकरी महासन्मान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

राज्यातील 11 लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 1554 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार, आजपर्यंतच्या पडताळणीत गोंदिया जिल्ह्यातील 5 हजार 645 शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले असून दीड हजार लाभार्थ्यांची जमीनच नाही..

त्यामुळे ही रक्कम वसूल करून अन्य शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर थकबाकी नोंद केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे निकष राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी लागू करण्यात आले असून राज्यातील 71 लाख लाभार्थी शेतकऱ्यांपैकी निकषांची पूर्तता न करणारे 32 लाख 37 हजार शेतकरी राज्य सरकारच्या पहिल्या हप्त्यापासून वंचित राहणार असल्याबाबतच्या प्रश्नावर राज्य सरकारने होय, हे अंशतः खरे असल्याचे लेखी उत्तरात म्हटले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमधील अपात्रतेच्या निकषानुसार राज्यात 14 लाख 28 हजार अपात्र लाभार्थीकडून 1754.50 कोटी रुपयांची रक्कम वसुलीपात्र आहे. यापैकी 1 लाख 4 लाभार्थीकडून 93.21 कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आल्याची माहितीही उत्तरात देण्यात आली आहे.

ही वसुली लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश जिल्हापातळीवर देण्यात आले आहे. यांची परतत झाल्यानंतरच महासंमं निधीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.