Take a fresh look at your lifestyle.

गणपती, दिवाळीत गरीब जनतेला या 4 वस्तूंसह ‘आनंदाचा शिधा ‘या’ दिवशी मिळणार ! अशी करा ऑफलाईन नोंदणी..

गणपती व दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य गरीब जनतेला दिलासा मिळावा यासाठी मोठा गाजावाजा करत राज्य सरकारने आनंदाचा शिधा वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब व अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबीयांना गणपती, दिवाळीनिमित्त वाटप करण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा या शिधासंचाचे वितरण ऑफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता 1 किलो साखर, 1 किला रवा, 1 किलो चणाडाळ व 1 लिटर पामतेल या चार वस्तू 1 सप्टेंबरपासून (शुक्रवार) ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यास सुरुवात होणार आहे.

गणपती व दिवाळीचा शिधा ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच पॉझ मशीनच्या माध्यमातून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र व्यवस्था इंटरनेटच्या माध्यमातून सुरू होती. परंतु इंटरनेटच्या माध्यमातून संथगतीने होत असल्यामुळे आनंदाचा शिधासंचाचे वाटप आता ऑफलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळीच्या निमित्ताने शिधा जिन्नस उपलब्ध करणे ही प्राधान्याची बाब असल्याने लवकरात लवकर जास्तीत जास्त पात्र शिधापत्रिकाधारकांपर्यंत आनंदाचा शिधा पोहचविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आनंदाचा शिधा 19 सप्टेंबर गौरी गणपती उत्सवानिमित्त व 12 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणानिमित्त वितरित केला जाणार आहे.

कधी होणार वितरण..

1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत वितरण
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांनाच लाभ
100 रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर तसेच एक लिटर खाद्यतेल मिळणार..