Take a fresh look at your lifestyle.

पुणे । 10 विच्या विद्यार्थ्यांना 15,000 रु. तर 12 विच्या विद्यार्थाना 25,000 रु. शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरु ; पहा ऑनलाईन अर्ज प्रोसेस…

शेतीशिवार टीम : 24 ऑगस्ट 2022 :- पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे . या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले आहेत . 22 ऑगस्ट ते 31 डिसेंबर या कालावधीत अर्ज करता येणार आहेत.

पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत आणि दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे.

एका शैक्षणिक वर्षासाठी जास्त अर्ज आल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रकमेतून समान रक्कम किंवा दहावी करिता रक्कम 15 हजार व बारावी करिता रक्कम 25 हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याची योजना आहे.

अर्थसाहाय्य उपलब्ध रक्कम व प्राप्त अर्ज यांचा विचार करून देण्यात येणार आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुधारित शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत खालील नियम व अटींत बसणाऱ्या मुलांच्या पालकांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर अर्ज ऑनलाइन पद्धतीने पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भरणे आहे. उपरोक्त योजनेचे अर्ज दि. 22 ऑगस्ट 2022 ते दि. 30 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरावेत.

जाहिरात पहा : येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा