Take a fresh look at your lifestyle.

PM Awas Yojana बाबत मोठं अपडेट ; 2024 पर्यंत अजून 1 कोटी 22 लाख घरे बांधण्यास मंजुरी ; अनुदानातही वाढ, असा करा ऑनलाईन अर्ज…

शेतीशिवार टीम : PM Awas Yojana : तुम्ही देखील PM आवास योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजनेला 2 वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. या योजनेंतर्गत 1 कोटी 22 लाख घरे बांधण्यासाठी मंजूरी देण्यात आली असून त्यापैकी 65 लाख घरे पूर्ण झाली असून अजून 1 कोटी 22 लाख लोकांना लवकरच घरे मिळणार आहेत.

केंद्र सरकार पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गरिबांना घरे देण्याचे काम करत आहे. यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांचे आत्तापर्यंतचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मोदी सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचे उद्दिष्ट गरीबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आहे…

पीएम आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा :-

pmaymis.gov.in वर भेट देऊन अर्ज कसा करावा (pmaymis.gov.in वरून PMAY साठी अर्ज कसा कराल)

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट pmaymis.gov.in ला भेट द्या..

वेबसाइटच्या वरच्या बाजूला तुम्हाला ‘Citizen Assessment’ चा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा.

येथे तुम्हाला अनेक ऑप्शन मिळतील. तुम्ही तुमच्या पत्त्यानुसार माहिती भरा.

यानंतर, तुम्हाला आधार क्रमांक भरावा लागेल आणि चेकवर क्लिक करावे लागेल.

यानंतर एक ऑनलाइन फॉर्म उघडेल.

या फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरा.

अर्ज भरल्यानंतर संपूर्ण माहिती पुन्हा एकदा वाचा. यानंतर सबमिट करा.

अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नंबर दिसेल तो नंबर म्हणजे तुमचा (Assessment ID) असेल त्याची प्रिंट काढा किंवा मोबाइलध्ये सेव्ह करा.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 3 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेली कोणतीही व्यक्ती…
ज्यांच्याकडे कोणतेही घर नाही, त्यांना याचा लाभ घेता येतो.

या योजनेत शासनाकडून आता अनुदान वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे आता 2.50 लाखांची मदत दिली जाणार आहे. या आधी 1.70 लाख रुपये अनुदान मिळतं होतं.

यामध्ये तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात :-

पहिला हप्ता :- 50 हजार रुपये
दुसरा हप्ता :- 1.50 लाख रुपये
तिसरा हप्ता :- 50 हजार रुपये

अर्जाचे स्टेटस कसे तपासाल ?

जर तुम्ही पीएम आवास योजनेसाठी देखील अर्ज केला असेल तर तुम्ही अर्जाची स्थिती ऑनलाइन पाहू शकता. कसे ते जाणून घेऊया :-

सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

येथे ‘ Citizen Assessment’ चा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा.

एक नवीन पेज उघडेल, ज्यावर ‘Track Your Assessment Status’ हा ऑप्शन उपलब्ध असेल. यावर क्लिक करा.

यानंतर, नोंदणी क्रमांक भरा (Assessment ID) आणि राज्य तपासण्यासाठी सांगितलेली माहिती द्या…

यानंतर, राज्य, जिल्हा आणि शहर निवडा आणि सबमिट करा. तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.