Take a fresh look at your lifestyle.

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर..! Fitment Factor बाबत आलं मोठं अपडेट, ‘या’ दिवशी पगार पोहचणार 26 हजारांवर..

केंद्रीय कर्मचाऱ्यांना अलीकडेच 4% महागाई भत्त्याचे गिफ्ट मिळालं आहे.आता आगामी काळात अनेक गिफ्ट त्यांचे वाट पाहत आहेत. यापैकी एक फिटमेंट फॅक्टर आहे. सरकार त्यात पुढील वर्षापर्यंत वाढही करणार असून याबाबत हालचाल सुरु झाली आहे. सरकारी कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरच्या संदर्भात एक अपडेट आलं आहे की, सरकार याबाबतचा सर्व आढावा घेऊन, तो पुढील वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात प्रचंड वाढ होणार आहे.

पुढील वर्षी फिटमेंटबाबत होणार मोठी घोषणा..

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये कोणतीही वाढ होणार नसली तरीही 2024 मध्ये त्याचा आढावा घेऊन त्यात वाढ करावी लागणार आहे. मात्र, अद्याप याबाबत सरकारकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. यावर आता वित्त विभाग विचारमंथन करणार आहे. तसेच शिफारशी अर्थ मंत्रालयाला पाठवल्या जाणार आहे.

त्याचबरोबर पुढील वर्षी नवा वेतन आयोगही स्थापन होऊ शकतो. अशा परिस्थितीत, फिटमेंट फॅक्टरवर निर्णय देखील त्यावेळी शक्य आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, पुढील वेतन आयोगापर्यंत फिटमेंट फॅक्टरवर कोणताही निर्णय घेणे शक्य नाही. पुढील वेतन आयोग कधी येईल हे सांगणेही कठीण आहे. पण, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात पुढील वर्षी सुधारणा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी का होत आहे ?

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी फिटमेंट फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या आधारे कर्मचाऱ्यांचे किमान वेतन (Basic Salary) किती वाढणार हे ठरविले जाते. 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारातील भत्त्यांव्यतिरिक्त, मूळ पगार केवळ फिटमेंट फॅक्टरने वाढतो.

गेल्या वेळी फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात अडीच पटीने वाढ झाली होती. परंतु, फिटमेंट फॅक्टर आणखी वाढवावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. त्यामुळे त्यांच्या मूळ पगारात चांगली वाढ होऊ शकते.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय ?

7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराची गणना 7 व्या वेतन आयोगाच्या नवीनतम अद्यतनाच्या फिटमेंट घटकाला 2.57 ने गुणाकार करून केली जाते. 7 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर, 6 व्या वेतन आयोगाच्या वेतन बँडमध्ये ग्रेड पे जोडून मूळ वेतन करण्यात आले. यामध्ये सध्याच्या एंट्री लेव्हलचा पगार फिटमेंट फॅक्टरला 2.57 ने गुणून काढण्यात आला, त्यातून कर्मचाऱ्यांच्या पे बँडनुसार पगार तयार केला गेला.

उदाहरणार्थ..

6 वा CPC पे बँड : PB 1
ग्रेड पे : रु. 1800
सध्याचे प्रवेश वेतन : रु. 7000
7व्या वेतन आयोगांतर्गत फिटमेंट फॅक्टर लागू केल्यानंतर एंट्री पे : 7000 x 2.57 = 18,000 रु.

फिटमेंट फॅक्टर 3 पट असेल तर ?

6वा CPC पे बँड : PB 1
ग्रेड पे : रु. 1800
सध्याचे प्रवेश वेतन : रु. 7000
7 व्या वेतन आयोगांतर्गत फिटमेंट फॅक्टर लागू केल्यानंतर एंट्री पे : 7000 x 3 = 21,000 रु.

पगारात किती होणार वाढ ?

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्याच्या प्रणालीमध्ये 2.57 फिटमेंट फॅक्टर मिळत आहेत. यावर आधारित, किमान वेतन (फिटमेंट फॅक्टर बेसिक सॅलरी) रु. 18000 आहे. ती वाढवून 3 केली तर मूळ वेतन 21000 रुपये होईल. दुसरीकडे, जर ते 3.68 पर्यंत वाढवता आला तर पगार 25,760 रुपये होईल. त्यांचा फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे यानुसार किमान वेतन 26000 रुपये ठेवावे..